
कोल्हापूर:भारतभूमी ही संताची भूमी आहे. भारतातील सगळ्या प्रांतांमध्ये अनेक थोर संत होऊन गेले. आज
सुमंगलम् पंचमहाभूत लोकोत्सवात केवळ राजकीय, सामाजिक लोकच सहभाग होत नसून यांच्यासह देशभरातील संतांनी या पर्यावरणपूरक उत्सवात सक्रीय सहभाग घेतला. काळ बदलतो, समाज बदलतो पण सत्य निती, चरीत्र, मानवता, कर्मयोग, प्रेम, बंधूभाव, दिनदुबळ्यांची सेवा ही संतांची तत्वे कधीच बदलत नाही. संत हे समाजाचे मार्गदर्शक आहेत.
आजपर्यंत जेंव्हा जेंव्हा समाजाला विविध विषयात ग्लानी आली आहे म्हणजेच समाज चुकीच्या दिशेने जात असेल तर त्या समाजाला योग्य दिशा दाखवायला देव साधू संतांच्या रूपाने येतो. आज या उत्कीचा प्रत्यय सिद्धगिरी मठावर आला. सर्व संत-महंतांनी यावेळी पर्यावरण रक्षणावर सर्वांनी मिळून पर्यावरण व पंचमहाभूतांच्या रक्षणाचा कृतीशील निर्धार केला. यावेळी देश भरतील विविध पंथांच्या संत महंतांचे एकत्रित दृश्य पहायला मिळाले.
Leave a Reply