आम. जयश्री जाधव यांच्या तारांकित प्रश्नाला यश : एमपीएससीचा नवा पॅटर्न २०२५ पासून लागू होणार 

 

कोल्हापूर: राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या वर्णनात्मक स्वरूपाच्या परीक्षेसंदर्भातील सुधारित परीक्षा योजना व अभ्यासक्रम सन २०२५ पासून लागू करण्यात येत असल्याचे आयोगाने स्पष्ट केले आहे. यामुळे एमपीएससी परीक्षा देणाऱ्या हजारो तरुणांच्या चेहऱ्यावर आनंद पाहायला मिळत आहे. तसेच कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदार संघाच्या आमदार जयश्री चंद्रकांत जाधव यांनी आगामी विधानसभा अधिवेशनात ताराकींत प्रश्न क्रमांक 61406 या द्वारे एमपीएससी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मागणीकडे शासनाचे लक्ष वेधले होते. यामुळे आमदार जयश्री चंद्रकांत जाधव यांच्या मागणीला यश मिळाले असून, एमपीएससी करणाऱ्या विद्यार्थ्यांकडून आमदार जयश्री चंद्रकांत जाधव यांचे अभिनंदन होत आहे. राज्य विधिमंडळाच्या मुंबई येथील अर्थसंकल्पीय अधिवेशनात एमपीएससीच्या सुधारित परीक्षा योजना व अभ्यासक्रम सन २०२५ पासून लागू करावा या मागणीकडे त्यांनी लक्ष वेधले होते. राज्यातील महाराष्ट्र लोकसेवा आयोग पूर्व परीक्षा देणारे MPSC विद्यार्थ्यांवर नवीन परीक्षा पद्धती लागू केल्यामुळे अन्याय होणार असल्याने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने तातडीने घेतलेला निर्णय मागे घेऊन पूर्वीची जुनी परीक्षा पद्धती लागू करावी व राज्यातील एमपीएससी परीक्षार्थी विद्यार्थ्यांना दिलासा द्यावा अशी प्रमुख मागणी सदरील तारांकीत प्रश्नच्या माध्यमातून केली होती.तसेच राज्यातील MPSC विद्यार्थ्यांनी कोल्हापूर शहरासह संपूर्ण राज्य भर विविध ठिकाणी आंदोलन सुद्धा केले होते.त्या अनुषंगाने आज अखेर राज्य सरकारला झुकावे लागले. महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांनी घेतलेला निर्णय मागे घेऊन पूर्वीची जुनी परीक्षा पद्धती लागू करण्यात आली आहे.त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातून नव्हे तर संपूर्ण राज्यातून लोकप्रिय कर्तव्य दक्ष आमदार श्रीमती जयश्री चंद्रकांत (आण्णा) जाधव यांनी MPSC विद्यार्थ्यांच्या अतिशय महत्वाच्या विषयावर तारांकित प्रश्नाच्या माध्यमातून शासनाकडे विचारणा करून सदरील विषयाला वाचा फोडली होती म्हणून त्यांचेवर सर्वच स्तरावरून विद्यार्थी व पालक वर्गातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. एमपीएससी विद्यार्थी यांनी कोल्हापूर उत्तर च्या काँग्रेस पक्षाच्याआमदार श्रीमती जाधव यांना दूरध्नीद्वारे धन्यवाद दिले आहेत .मी कोल्हापूर जनतेचे व राज्यातील हिताचे शेतकरी, विद्यार्थी, महिला, व्यापारी, कष्टकरी, अपंग, निराधार, कामगार व गोरगरीब सर्व जाती धर्मातील सर्वसामान्य जनतेच्या हिताचे व त्यांच्या मूलभूत हक्कांचे प्रश्न विधिमंडळात मांडून त्या बाबत सरकारला निर्णय घेण्याकरिता भाग पाडण्याचा प्रामाणिक प्रयत्न करून कोल्हापूर जनतेचा आवाज विधिमंडळात पोहोचण्यासाठी कटिबध्द असल्याचे आमदार श्रीमती जयश्री जाधव यांनी याबद्दल प्रतिक्रिया देताना सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!