
कोल्हापूर:मानवी जीवन हे एकदाच मिळते, त्यामुळे नैतिकता जपून चांगलं जगा आणि आपल्या देशाचं नाव मोठं करा .आपल्या प्रत्येकात सुप्त गुण असतात. ते ओळखून स्वतः ला डेव्हलप करा. स्वतः चे पॅशन जपा. चांगल्या संस्कारासाठी आई-वडिलांशी सुसंवाद असणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.डॉ. डी.वाय.पाटील ग्रुपच्या वतीने आयोजित कार्यक्रमात जम्मू आणि काश्मीर पोलीस दलातील सीआयडी सेलच्या असिस्टंट कमिशनर ऑफ पोलीस डॉ. शहिदा परवीन गांगुली यांनी संस्थेतील ३ हजारांहून अधिक विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले. मानवी जीवन हे एकदाच मिळते, त्यामुळे नैतिकता जपून चांगलं जगा आणि आपल्या देशाचं नाव मोठं करा .आपल्या प्रत्येकात सुप्त गुण असतात. ते ओळखून स्वतः ला डेव्हलप करा. स्वतः चे पॅशन जपा. चांगल्या संस्कारासाठी आई-वडिलांशी सुसंवाद असणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.९० पेक्षा जास्त एन्काउंटर करणाऱ्या शहीदा गांगुली यांनी काही थरारक अनुभव यावेळी सांगितले. विद्यार्थिनींशी संवाद साधताना त्यांच्या प्रश्नांना समर्पक उत्तरे दिली.याप्रसंगी डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ. संजय डी. पाटील यांच्या हस्ते शहिदा परवीन गांगुली यांचे पती ब्रिगेडियर गौतम गांगुली यांचा सन्मान करण्यात आला.या कार्यक्रमास डॉ. डी. वाय. पाटील ग्रुपचे विश्वस्त पृथ्वीराज पाटील, सौ. पूजा ऋतुराज पाटील, सौ. वृषाली पृथ्वीराज पाटील, कुलगुरू डॉ.राकेश कुमार शर्मा, डॉ. के. प्रथापन, कार्यकारी संचालक डॉ.ए.के.गुप्ता, रजिस्ट्रार डॉ. विश्वनाथ भोसले, प्राचार्य डॉ.महादेव नरके यांच्यासह संस्थेतील प्राचार्य, स्टाफ आणि विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. सूत्रसंचालन सीएसआरओ श्रीलेखा साटम यांनी केले.
Leave a Reply