
कोल्हापूर : राष्ट्रीय संत डॉ. वसंत विजय महाराज यांच्या जयंतीनिमित्त २६ फेब्रुवारी ते ५ मार्च या कालावधीत होणाऱ्या आठ दिवसीय महालक्ष्मी महोत्सवाची तयारी पूर्ण झाली आहे. सुमारे १३ एकर जागेवर उभारण्यात आलेल्या उत्सवाच्या ठिकाणी भव्य कथा पंडाल आणि भव्य १०८ कुंडिया हवन यज्ञ कुटीर पूर्ण झाले आहे. ५ मार्च रोजी संत श्री वसंत विजय महाराज यांच्या जयंतीनिमित्त पूज्य धनलक्ष्मी माँ यांच्या पाच हजार पंचधातू मूर्ती दर्शन व पूजनासाठी ठेवण्यात आल्या आहेत. केरळचे राज्यपाल माननीय आरिफ खान मोहम्मद खान यांच्या हस्ते रविवार, २६ फेब्रुवारी रोजी भव्य श्री लक्ष्मी महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे. श्री खान याप्रसंगी गरिबांना रेशन आणि ब्लँकेटचे वाटपही करणार आहेत. अशी माहिती आज पत्रकार परिषदेत देण्यात आली.
Leave a Reply