
कोल्हापूर : हे कलापूर आहे. कोल्हापूरला सिनेसृष्टीची थोर परंपरा आहे. कलामहर्षी बाबुराव पेंटर, चित्रतपस्वी भालजी पेंढारकर व मंगेशकर कुटुंबीयसुद्धा कोल्हापुरातूनच पुढे आले आहेत. स्वर्गीय भालजी पेंढारकर यांचा पहिला स्टुडिओ कोल्हापुरात होता. यामुळेच, कोल्हापूरला चित्रनगरी स्थापन करण्याचा निर्णय २००७ ला घेतला, २००८ पासून ते काम बंद झाले. दोन्हीही सरकारच्या काळात या कामाला चालना मिळायला पाहिजे होती. कारण, तिथे एवढे चांगले वातावरण आहे. एवढी चांगली जमीन आहे. मुंबईला चित्रनगरी आहेच, दुसरी चित्रनगरी कोल्हापूरला विकसित झाली तर बरेचसे चांगले काम होईल. चित्रनगरीच्या विकासासाठी सरकारने गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. कोल्हापूर चित्रनगरी हैदराबादच्या रामोजी फिल्मसिटीपेक्षाही चांगली होऊ शकते. यासाठी शासन प्रयत्न करेल काय?
उत्तरार्थ सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले, कोल्हापूर चित्रनगरीच्या विकासाठी सरकार अतिशय जीव लावून, मन लावून प्रयत्न करेल. कोल्हापूर चित्रनगरी आपल्या मनासारखी होईपर्यंत हे सरकार कुठेही थांबणार नाही. त्यासाठी कुठेही, कोणतीही राजकीय अडचण येणार नाही याची काळजी सरकार घेईल.
Leave a Reply