
कोल्हापूर : काबाडकष्ट करून पिक घेणाऱ्यां शेतकऱ्यांना त्याची किंमत मिळत नाही.. शेतकऱ्यांचा घाम व रक्त कवडीमोल समजले जाते ,हेच वास्तव रौंदळ सिनेमात मांडण्यात आले आहे. मालाला भाव मिळत नाही, जरी भेटला तरी त्याला पाडून भाव दिला जातो. हे चित्र बदलण्यासाठी शेतकऱ्यांच्या पोरांना जन आंदोलनाशिवाय पर्याय नाही अशी प्रतिक्रिया मा.खा.राजू शेट्टी यांनी कोल्हापुरात दिली.
रौंदळ या सिनेमाचा शेतकऱ्यांसाठी विशेष खेळाचे आयोजन आयनाॅक्स सिनेमा हाॅल, रिलायंस माॅल येथे करण्यात आले होते.त्या निमित्ताने प्रमुख पाहुणे म्हणून राजू शेट्टी बोलत होते. यावेळी चित्रपटातील अभिनेते सौरभ डिंबाळे व दिग्दर्शक गजानन पडोळ उपस्थित होते.
यावेळी मा.राजू शेट्टी यांनी आपल्या आठवणी सांगताना म्हणाले,आंदोलन करत असताना पोलिसांनी गुढघ्याची वाटी फोडली, डोके फोडले, गुंडांनी मरूपर्यंत मारहाण करून रस्त्यावर फेकून दिलं, आणि अनेक केसेस अंगावर घेत गेली 20-25 वर्ष सुरू असलेला लढा डोळ्यासमोरुन जात होता. शेतकऱ्यांचे वास्तव जीवन व संघर्ष दाखविणारा हा सिनेमा सर्वांनी नक्की पाहावा अस आवाहन राजू शेट्टी यांनी यावेळी केले आहे.अभिनेते सौरभ डिंबाळे यांनी या चित्रपटाला मिळालेल्या भरघोस प्रतिसादाबद्दल प्रेक्षकांचे आभार मानले.
यावेळी ऊस उत्पादक शेतकरी आणि बाजारभाव यावर आधारित या चित्रपटाला मा.खा.राजू शेट्टी यांचेसह मोठ्या संख्येने शेतकरी बांधव उपस्थित होते.
Leave a Reply