
कोल्हापूरः गोकुळ दूध संघाची स्थापना १६ मार्च १९६३ इ. रोजी ७०० लिटर दूध संकलनावर झाली. आज ७०० लिटर वरुन सध्या प्रतिदिनी सरासरी १४ लाख लिटर दूध संकलन होत आहे. यासाठी दूध उत्पादक शेतकरी, दूध संस्था, व कर्मचारी यांचे सहकार्य मोलाचे असून त्यांच्या सहकार्यामुळेच गोकुळ २० लाख लिटरचे उध्दिष्ठ साध्य करेल असा विश्वास संघाचे चेअरमन विश्वास पाटील यांनी व्यक्त केला. गोकुळच्या ६०व्या वर्धापन दिनानिमीत्य गोकुळ दूध संघाच्या प्रधान कार्यालय गोकुळ शिरगाव येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये सत्यनारायण पूजा अजित नरके यांच्या हस्ते संपन्न झाली, सन २०२२ -२३ सालातील गोकुळश्री स्पर्धेतील विजेते स्पर्धकान बक्षीस वितरण करण्यात आले, तसेच संघाच्या कर्मचा-यांना ‘गुणवंत’ कामगार पुरस्कार देवून सन्मानित करणेत आले व संघाच्या मार्केटिंग विभागामार्फत कोल्हापूर, पुणे व मुंबई येथील जास्तीत-जास्त दूध विक्री करणा-या दूध वितरकांचाही सत्कार करणेत आला. प्राचार्य मधुकर पाटील यांचे कर्मचार्यांसाठी गोकुळ: सहकारातून समृद्धीकडे या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते तसेच सध्याच्या आधुनिक युगामध्ये जगभरातील लोक सोशल मिडीयाचा वापर त्यांच्या दैनंदिन व्यवहारामध्ये वेगवेगळ्या उत्पादनांची माहिती घेणेसाठी करत आहोत. हे ओळखून जगभरातील प्रतिथयश कंपन्यानीही सोशल मीडियाचा वापर त्यांच्या व्यवसायवृद्धीसाठी सुरु केला आहे.गोकुळ दूध संघानही स्वतःचे अधिकृत ‘गोकुळ मिल्क ऑफिशयल’ या नावाने यूटयूब चॅनेल सुरु केले आहे. अशा विविध कार्यक्रमानी हीरक महोत्सव वर्धापनदिन साजरा करण्यात आला.
Leave a Reply