खुलासा करण्यासाठी हजारो शेतकरी ईडी कार्यालयात

 

कोल्हापूर: सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याबद्दल मुरगुड पोलीस स्टेशनमध्ये दाखल केलेल्या फसवणुकीच्या गुन्ह्याच्या स्पष्टीकरणासाठी कार्यक्षेत्रातील एक हजारहून अधिक शेतकरी  मुंबईच्या ईडी कार्यालयात पोहचले.
संजय चितारी यांनी कागलचे विवेक कुलकर्णी आणि 16 जणांनी दाखल केलेल्या फसवणुकीच्या गुन्ह्याच्या अनुषंगाने वस्तुस्थितीचा खुलासा करण्यासाठी शेतकरी  ईडी कार्यालयात ,पोहचले.मुंबईत ईडी कार्यालयात गेलेल्या गोकुळचे संचालक व ज्येष्ठ जिल्हा परिषद सदस्य युवराज पाटील, जिल्हा परिषद सदस्य मनोजभाऊ फराकटे, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष सतीश पाटील- गिजवणेकर, नवल बोते, विकास पाटील, प्रवीणसिंह भोसले, नितीन दिंडे आदी प्रमुखांची पोलिसांकडून धरपकड सुरू झाली.पोलिसांनी पकडून नेलेल्या प्रमुख नेतेमंडळी, कार्यकर्ते व शेतकऱ्यांना आझाद मैदानावर नेऊन  मुक्त केले.त्यानंतर पोलिसांनी शेतकऱ्यांना शीतपेये आणि पाणी देऊन आदरातिथ्य केल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!