
कोल्हापूर : राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांचे चिरंजीव युवा नेते ऋतुराज क्षीरसागर यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला.युवा नेते ऋतुराज क्षीरसागर यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी युवा सेना कोल्हापूर आणि नो मर्सी ग्रुपच्या माध्यमातून विविध समाजोपयोगी कार्यक्रम राबविण्यात येतात. समाजोपयोगी उपक्रम अविरत सुरु ठेवत यावर्षीही युवा नेते ऋतुराज क्षीरसागर यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. वाढदिवसाचे औचित्य साधून श्री महालक्ष्मी अन्नछत्रच्या वतीने भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपस्थित भाविकांना .ऋतुराज क्षीरसागर यांच्या हस्ते अन्नदान करण्यात आले. यानंतर पांजरपोळ गोशाळा येथे शिवसेना विभाग राजारामपुरी यांच्यावतीने गोमाता पूजन करण्यात आले व गुरांना चारा वाटप करण्यात आले. त्याचबरोबर गरजू गोरगरिबांना मोफत अन्नदानाची अविरत सेवा बजावणाऱ्या श्री उत्तरेश्वर थाळी उपक्रमास .ऋतुराज क्षीरसागर यांच्यामार्फत ग्रायंडर मशीन भेट देण्यात आले. यानंतर सीपीआर चौक येथील कोल्हापुरी थाळी येथेही गोरगरिबांना अन्नदान करण्यात आले. यानंतर चंबुखडी येथील मातोश्री वृद्धाश्रमात जेष्ठ नागरिकांना स्नेहभोजन देण्यात आले. यावेळी जेष्ठ नागरिकांनी . शिवसेना शाखा अष्टविनायक ग्रुप यांचेमार्फत रुग्णवाहिका प्रदान करण्यात आली. याप्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण, माजी महापौर मारुतीराव कातवरे, माजी नगरसेवक ईश्वर परमार, माजी नगरसेवक राजू हुंबे, सामजिक कार्यकर्ते विकी महाडिक, रियाज सुभेदार, महानगरप्रमुख शिवाजी जाधव, महानगरसमन्वयक जयवंत हारुगले, शहरप्रमुख रणजीत जाधव, शहरप्रमुख महेंद्र घाटगे, उपजिल्हाप्रमुख किशोर घाटगे, उदय भोसले, रमेश खाडे, महिला आघाडी महानगरप्रमुख सौ.मंगलताई साळोखे, शहरप्रमुख सौ.पवित्रा रांगणेकर, समन्वयक श्रीमती पूजा भोर, सौ.मंगल कुलकर्णी, सौ.पूजा कामते, सौ.शारदा भांदिगरे,श्रीमती मीनाताई पोतदार, सौ.गौरी माळतकर, सौ.पूजा पाटील, रुपाली कवाळे, सौ.पूजा शिंदे यांच्यासह विविध समाज, तालीम संस्था, मंडळांचे पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Leave a Reply