आ.हसन मुश्रीफ यांच्या वाढदिवसानिमित्त ‘गोकुळतर्फे’ औषधी वनस्पतींचे वृक्षारोपण  

 

कोल्‍हापूर :महाराष्ट्र राज्याचे माजी ग्रामविकास मंत्री आमदार हसन मुश्रीफसो यांच्या ७० व्या वाढदिवसानिमित्त गोकुळ दूध संघाच्या वतीने संघाच्या ताराबाई पार्क येथील कार्यालयाच्या आवारात औषधी वनस्पतीचे वृक्षारोपन कार्यक्रम गोकुळचे चेअरमन विश्वासराव पाटील यांच्‍या हस्‍ते व संचालक मंडळाच्या उपस्थित पार पडला.याप्रसंगी बोलताना संघाचे चेअरमन विश्वासराव पाटील म्हणाले आमचे नेते आमदार हसन मुश्रीफ साहेब म्हणजे कोल्हापूर जिल्ह्याला लाभलेलं वरदानच म्हणावं लागेल. त्यांच्या आमदारकीची व मंत्रिपदाची २५ वर्षं म्हणजे विकासपर्वच आहे. वृद्ध, अपंग, निराधार व रुग्ण या सर्वांसाठी त्यांनी संवेदनशीलपणे काम करत आहेत. याचमुळे त्यांच्या नेतृत्वातून माणुसकीचं अफाट दर्शन होत असतं. ज्या नेतृत्वाला माणुसकीचा स्पर्श आहे ते नेतृत्व लक्षवेधी ठरत असते. यामुळेच समाजातील प्रत्येक घटकांशी त्यांचं वेगळं नातं निर्माण झालं आहे.अशा नेतृत्वास गोकुळ परिवारातर्फे वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. पुढे बोलताना श्री.पाटील म्हणाले कि या ७० व्या  वाढदिवसाचे औचित्य साधून आयुर्वेदिक ७० वनस्पतीचे वृक्षारोपण करण्यात आले. गोकुळ आपल्या कार्यक्षेत्रातील जनावरांसाठी आयुर्वेदिक उपचार सेवा अत्यंत  प्रभावीपणे राबवत आहे. याचाच एक भाग म्हणून ‘औषधी वनस्पतीचे वृक्षारोपण ही काळाची गरज आहे’. प्रत्येक दूध उत्पादक शेतकऱ्यांनी या आयुर्वेदिक वनस्पतीचे लागवड करावी. कोरफड, आडूळसा, शतावरी, हळद,तुळस, गुळवेल, हाडजोड,शेवगा,कढीपत्ता,कडुलिंब, लिंबू, लाजाळू, जांभळ, फणस, कडुलिंब, कदंब,इ वनस्पतींचे वृक्षारोपण केले असून सदरच्या वनस्पतीची वापर प्रामुख्याने जनावरांच्या मस्टायसिस व इतर आजार ताप, डायरिया, अपचन, विषबाधा ,लाळ खुरकत बरे करण्यासाठी केला जातो. या वाढदिवसाचे औचित्य साधून दूध उत्पादक शेतकर्यांनी औषधी वनस्पतींची लागवड करावी व जनावरांच्या आरोग्य चांगले राखण्यासाठी जास्तीत जास्त आयुर्वेदिक उपचार पद्धतीचा वापर करावा असे आवाहन चेअरमन विश्वासराव पाटील यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!