
कोल्हापूर:सर्व गटात आमच्या परिवर्तन पॅनेलचे उमेदवार आहेत.कोणताही गट बिनविरोध होणार नाहीत.29 उमेदवार अपात्र ठरविण्याच्या निर्णयाला हाय कोर्टात आव्हान देणार.आपण थांबायचे नाही.. आपल ठरलंय .. कंडका पाडायचा !चांगला कारभार केला तर रडीचा डाव का खेळता ??कुस्ती करायची होती. मग पळपुटेपणा का करता ?पत्ता कसलाही असुदे. तुम्ही जोकर टाकलाय. पण १२ हजार सभासद हा एक्का माझ्याकडे आहे.ही लढाई महाडिक आणि बंटी पाटील अशी नाही. तर कोल्हापूरचे १२ हजार सभासद विरुद्ध येलूरचे ६०० सभासद अशी आहे.ही निवडणूक काहीही झाले तरी जिंकायची आहे.. असा घणाणात सतेज उर्फ बंटी पाटील यांनी केला. राजाराम कारखान्याची निवडणुक जवळ आली आहे. या प्रसंगी ते बोलत होते.
Leave a Reply