
कोल्हापूर/प्रतिनिधी : येत्या २२ एप्रिल २०२३ रोजी मुस्लिम बांधवांचा रमजान ईदचा सण साजरा होत आहे. या सणाच्या निमित्ताने लागणाऱ्या साहित्यांची एकाच ठिकाणी, एकाच छताखाली उपलब्धता व्हावी या हेतूने सिराज सय्यद फाउंडेशनतर्फे उत्कृष्ट दर्जेदार व रास्त दरातील उत्पादनांचे प्रथमच अनेक स्टॉलचे अनोखे दालन येथील दसरा चौक मैदानावर येत्या १५ ते २१ एप्रिल दरम्यान आयोजित करण्यात आले आहे.या दालनचे आज उदघाटन झाले.यावेळी समाजात विविध क्षेत्रात उत्कृष्ठ काम करणाऱ्या व्यक्ती व संस्थांचा सत्कार करण्यात आला.यामध्ये जेष्ठ पत्रकार नाना पालकर,कोल्हापूर प्रेस क्लबचे अध्यक्ष शितल धनवडे,फरहान मकानदार, कोरोना काळात उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल मणेर मस्जिद, आरोग्यदूत बंटी सावंत,रास्त भाव धान्य दुकानदार संघटनेचे जिल्हाध्यक्ष रविंद्र मोरे,संतोष पवार,केदार कुलकर्णी, विशाल माणगावे,विद्यापीठ हायस्कूल ची ९१ सालातील बॅच जे इफ्तार पार्टी आयोजित करतात त्यांचा व सागर चौगुले आणि सरकार प्रतिष्ठान यांच्यासह सामजिक ऐक्याची भावना जोपासणाऱ्या हिंदू बांधवांचा देखिल सत्कार करण्यात आला.यावेळी अध्यक्षस्थानी जेष्ठ पत्रकार नाना पालकर होते.यावेळी प्रास्ताविक पर भाषणात सिराज फौंडेशनचे अध्यक्ष साजिद सय्यद यांनी रमजान निमित्त आयोजित या ईद फेस्टिवलमध्ये रमजान साठी लागणारे सर्व साहित्य याठिकाणी उपलब्ध करून देण्यात आले असून याचा लाभ हिंदू व मुस्लिम बांधवांनी घ्यावा असे आवाहन केले.
या दालनामध्ये रमजान ईद फेस्टिवल निमित्त विविध कार्यक्रम होणार आहेत असे सांगितले.हिदायत मणेर यांनी रमजान निमित्त हे रमजान निमित्त साहित्य एकाच ठिकाणी खरेदी करता यावे यासाठी या फेस्टिवलचे आयोजन करण्यात आल्याचे सांगितले. रास्त भाव धान्य दुकानदार संघटनेचे जिल्हाध्यक्ष रविंद्र मोरे यांनीही बोलताना या दालन च्या माध्यमातून एक चांगली बाजारपेठ उपलब्ध झाली असून याचा फायदा सर्वानाच हॊणार असल्याचे सांगितले.
यावेळी व्यासपीठावर उदगावचे प्रसिद्ध मौलाना उबेदूल्ला इराणी,हिदायत मणेर अब्दुल रहीम दुल्ला यांची उपस्थिती होती.या रमजान ईद फेस्टिव्हलमध्ये शेवया,दूध व दुग्धजन्य पदार्थ,ड्रायफ्रूट, बेकरी उत्पादन,रोट, तांदूळ,मसाले, क्रॉकरी,इमिटेशन ज्वेलरी,चप्पल,मेकअप साहित्य,होजिअरी,गारमेंट्स,टू. व्हीलर व फोर व्हीलर,फर्निचरआदी साहित्य खरेदी करता येणार आहे.फेस्टिवल २१ एप्रिलपर्यंत असणार आहे.
Leave a Reply