
खोची: राजाराम कारखान्यात २८ वर्षे सत्ता भोगणारे महाडीक हे भेसळीच्या कारभाराचे जनक आहेत. त्यांच्या पेट्रोल पंपावर १०० रुपयांचे पेट्रोल भरायचे असेल तर १०० वेळा विचार करावा लागतो, अशी टीका हातकणगले पंचायत समितीचे माजी उपसभापती अजयसिंह पाटील यांनी केली. छ. राजाराम कारखाना निवडणूक प्रचारार्थ परिवर्तन आघाडीच्यावतीने खोची येथे आयोजित सभेत ते बोलत होते. यावेळी आमदार सतेज पाटील यांची उपस्थिती होती.
अजयसिंह पाटील, खोची पासून कोल्हापूरपर्यंत अनेकांचे पेट्रोल पंप आहेत. या मार्गावरील महाडीकांच्या पेट्रोल पंपावर वाहनधारक पेट्रोल टाकण्यासाठी गाडी वळवण्यास कचरतात. आजपर्यंत भेसळीच्या धंद्यातून महाडीकानी नागरिकाना लुटले आहे. राजाराम कारखान्यातील त्यांचा कारभारही असाच गोलमाल आहे. कुठल्याही संस्थेत केवळ स्वत:चा फायदा बघणारे महाडीक सभासदांचे हित काय जपणार? निवडणुकीच्या तोंडावर महाडीक देत असलेल्या भूलथापाना बळी पडू नका.
माजी अध्यक्ष सर्जेराव माने म्हणाले, बोगस कारभार करणार महाडीक पिता-पुत्र म्हणजे लबाडांची जोडी आहे. लबाडी करूनच त्यानी आमचे २९ उमेदवार अपात्र ठरवले. मात्र, त्यांची ही लबाडी सभासदानी ओळखली असून २३ तारिखला तेच यांचा कंडका पाडतील.
आमदार सतेज पाटील, सभासद हा कारखान्याचा आत्मा आहे. मात्र गेल्या २८ वर्षातील राजाराम कारखान्यातील कारभार पाहिल्यानंतर कारखाना आणि सभासद यांच्यातील नाते तुटले आहे. त्यामुळे सभासदांनी हे नाते पुन्हा दृढ करण्यासाठी, तसेच कारखान्याला गतवैभव मिळवून देण्यासाठी ‘अंगठी’ला विजयी करावेग्रा. प. सदस्य प्रमोद सूर्यवंशी म्हणाले, महाडीकांच्या जुलमी कारभारातून कारखाना वाचवण्यासाठी सभासदांनी स्वाभिमानी नेतृत्व आमदार सतेज पाटील यांच्या परिवर्तन आघाडीच्या पाठीशी रहावे.
यावेळी प्रा बी के चव्हाण ,जयकुमार बाबर यांनीही मनोगत व्यक्त केले. यावेळी डॉ. अनिल पाटील, बापूसाहेब पाटील,दिलीप सूर्यवंशी, वसंत बाबर, अमोल पाटील,राजू पाटील, अभिजित भंडारी,अमर पाटील, बबन रानगे, मोहन सालपे,दिलीप पाटील शिवाजी किबीले यांच्यासह परिवर्तन आघाडीचे उमेदवार आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Leave a Reply