
कोल्हापूर : श्री महावीर को-ऑपरेटिव्ह बँकेची परिस्थिती खराब असतानाही एसव्हीसी को-ऑपरेटिव्ह बँकेने विलीनीकरण करून घेतले. सर्व ठेवीदारांचे पैसे दिले, कर्मचाऱ्यांना सामावुन घेतले. त्यातील काही कर्मचारी सन्मानाने निवृत्त झाले अन काही कर्मचारी अजुनही कार्यरत आहेत. परंतु आता महावीर बँकेचे काही माजी संचालक एसव्हीसी बँकेच्या निवडणुकीची संधी साधुन आपला वैयक्तिक फायदा करुन घेण्यासाठी एसव्हीसी को-ऑपरेटीव्ह बँकेबद्दल खोट्या बातम्या पसरवत आहेत. एसव्हीसी बँकेचा प्रगतीचा आलेख सतत उंचावत आहेत आणि या बँकेचे संचालक मंडळ सुशिक्षित, कर्तव्यनिष्ठ आणि व्यावसायिक आहे. तरी बँकेच्या ग्राहकांनी खोट्या बातम्यांना बळी पडू नये, असे आवाहन एसव्हीसी को-ऑपरेटिव्ह बँकेच्या संचालक मंडळाने केले आहे. अशा खोट्या अपप्रचारावर विश्वास ठेवू नये आणि काही शंका-कुशंका असतील तर बँकेकडे सदरचे पुरावे उपलब्ध असल्याचे बँकेने म्हटले आहे.एसव्हीसी को-ऑपरेटिव्ह बँक लि. ही 117 वर्षांची परंपरा असलेली बहु-राज्यस्तरीय शेड्युल्ड दर्जाची सहकारी बँक आहे. भारतीय रिझर्व्ह बँक आणि केंद्रीय निबंधक सहकारी संस्था, नवी दिल्ली यांच्या नियमावलीनुसार ही बँक संचलित आहे. 1906 साली स्थापित झालेली ही भारतातील सर्वात मोठी दुसरी सहकारी बँक आहे. या बँकेच्या 198 शाखा देशातील 11 राज्यांत कार्यारत आहेत. ही बँक स्थापनेपासुन सात्यत्याने दरवर्षी नफा कामावत आहे आणि भागभांडवलावर लाभांश देते आहे. 31.03.2023 रोजी बँकेचा एकूण व्यवसाय 33 हजार कोटी रुपये असुन नफा 176 कोटी रुपये आणि नेट एनपीए अवघा 0.79 टक्के आहे. एसव्हीसी को-ऑपरेटिव्ह बँक ही ग्राहक सेवेसाठी उत्तम समर्पित बँक म्हणून ओळखली जाते आणि याची प्रचिती बँकेला मिळालेल्या विविध पुरस्कारातून वेळोवेळी दिसून आली आहे. एसव्हीसी बँक ही नियमीतपणे दर पाच वर्षांनी संचालक मंडळाच्या निवडणुका नियमाप्रमाणे घेत आहे. बँकेचे संचालक हे उच्च शिक्षित तसेच प्रोफ़ेशनल आहेत आणि त्यांनी बँकेला वेळोवेळी केलेल्या मार्गदर्शनाने बँक प्रगती आणि विकासाच्या मार्गावर वेगाने वाटचाल करत आहे.एसव्हीसी को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेडने श्री महावीर को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेडचे 2006 मध्ये आपल्यात विलिनीकरण करून घेतले आणि भारतीय रिझर्व्ह बँक आणि सहकारी संस्थांचे रजिस्ट्रार यांच्या परवानगीने हे विलिनीकरण पार पडले होते. आर्थिक परिस्थिती अत्यंत खालवलेवी असल्यामुळे त्यांनी एसव्हीसी बँकेकडे विलीनीकरणाचा प्रस्ताव सादर केला होता.सदर विलिनीकरणाच्या प्रस्तावाला रजिस्ट्रार ऑफ को-ऑपरेटिव्ह सोसायटीज, महाराष्ट्र शासन व रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया यांनी काही अटी व शर्थींसकट परवानगी दिली. या अटींपैकी एक अशी होती की, श्री महावीर सहकारी बँकेच्या शाखांचा हिशोब व हिशोबाची पुस्तके ही 10 वर्ष वेगळी राखली जातील आणि जर त्यामध्ये असलेला संचित तोटा संपूर्णपणे निर्लेखीत झाला असेल तर त्या प्रमाणात त्यांचे भागभांडवलाचे पैसे भागभांडवलधारकांना परत करावेत. त्याप्रमाणे बँकेने 10 वर्ष पूर्ण झाल्यानंतर, मेसर्स संजय राणे आणि असोसिएट या नावाजलेल्या सीए फर्मकडून सदर हिशोबाची तपासणी करुन घेतली. त्यांच्या रिपोर्टप्रमाणे, झालल्या नुकसानीची पूर्ण भरपाई झाली नसल्यामुळे विलीनीकरणाच्या अटी वा शर्थींप्रमाने भाग भांडवलधारक ते पैसे परत मिळण्यास पात्र नाहीत, असे बँकेने स्पष्ट केले आहे.यावर एसव्हीसी सहकारी बँक लिमिटेडच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या संदर्भात काही उमेदवार बँकेचा अपप्रचार करत आहेत जेणेकरुन बँकेच्या शेअरहोल्डर्सच्या मनात भीती निर्माण होईल. बँक लवकरच त्यांच्यावर कायदेशीर कडक कार्यवाही करणार आहेत असे बँकेने म्हटले आहे.
Leave a Reply