कोल्हापूर: कसबा बावडा येथील डॉ. डी. वाय. पाटील पॉलिटेक्निकच्यावतीने ‘दहावीनंतरच्या करिअर संधी आणि डिप्लोमा इंजिनिअरिंग प्रवेश प्रक्रिया’ याबद्दल मार्गदर्शनपर कार्यशाळा आयोजित केली आहे. रविवार (दि. 4 जून) सकाळी 9.30 वाजता कसबा बावडा येथे पॉलिटेक्निकच्या सेमिनार हॉलमध्ये ही कार्यशाळा होणार आहे. यामध्ये विद्यार्थी आणि पालकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन प्राचार्य डॉ. महादेव नरके यांनी केले आहे.
दहावीच्या परीक्षेचा ऑनलाईन निकाल शुक्रवारी जाहीर झाला. विद्यार्थ्यांच्या करिअरसाठी हा टप्पा फार महत्त्वाचा ठरतो. दहावीनंतर नेमके कोणत्या क्षेत्रात जायचे? याबद्दल विद्यार्थ्यांबरोबरच पालकांच्याही मनात अनेक प्रश्न असतात. ही गोष्ट ध्यानात घेऊनच डॉ. डी. वाय. पाटील पॉलिटेक्निकच्यावतीने दहावीनंतरच्या करिअरच्या कोणकोणत्या संधी आहेत ? करिअर क्षेत्र कसे निवडावे ? याबद्दल मार्गदर्शन केले जाणार आहे. त्याबरोबरच डिप्लोमा इंजीनियरिंग प्रवेश प्रक्रिया कशाप्रकारे होते प्रवेशासाठी कोणत्या कागदपत्रांची आवश्यकता असते, शासनाच्या वतीने कोणकोणत्या स्कॉलरशिप दिल्या जातात, याबद्दलही कार्यशाळेत माहिती दिली जाणार आहे.या कार्यशाळेमध्ये प्राचार्य डॉ. महादेव नरके, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभाग प्रमुख प्रा. नितीन माळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत.
Leave a Reply