
कोल्हापूर : शासन आपल्या दारी अभियानाचा कोल्हापूर जिल्ह्यातील कार्यक्रम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत १३ जून रोजी तपोवन मैदानात होणार आहे. या उपक्रमातून कोल्हापूर जिल्ह्यातून सुमारे ७५ हजार लाभार्थ्यांना विविध शासकीय योजनांचा लाभ देण्याचे शासनाचे उद्दिष्ठ आहे. याकरिता जिल्ह्यातील १२ तालुक्यातून लाभार्थी यांच्यासह शिवसेना – भाजप युतीचे कार्यकर्ते लाखोंच्या संख्येने सभेला उपस्थित राहणार असून, ही सभा “न भूतो न भविष्यति” अशा पद्धतीची होईल. सभेची संपूर्ण तयारी झाली असून, सभा यशस्वी करण्यासाठी शिवसैनिक सज्ज असल्याचे प्रतिपादन राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांनी केले आहे. सभेच्या पार्श्वभूमीवर आज राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्यासह खासदार संजय मंडलिक, आमदार प्रकाश आबिटकर आणि शिवसेनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी सभा स्थळाची पाहणी करत, सुरु असलेल्या जय्यत तयारीचा आढावा घेतला. यासह आवश्यक सूचना प्रशासनास दिल्या.
Leave a Reply