
कोल्हापूर: नियमित योगा केल्यामुळे शरिरातील स्नायूंना बळकटी मिळून, शरीर व्याधीमुक्त राहते आणि माणूस निरोगी दिर्घायुष्य जगू शकतो. २१ जून या जागतिक योग दिनाचे औचित्य साधून, कोल्हापुरातील चॅनल बी च्या वतीने, योग प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. ताराबाई पार्कमधील धैर्यप्रसाद हॉलमध्ये सकाळी साडेसहा ते आठ या वेळेत योगप्रशिक्षण शिबीर होईल. भारत सरकारच्या आयुष मंत्रालयाच्या मान्यताप्राप्त योगा प्रशिक्षक ऐश्वर्या कांझर या शिबिरात योगाचे प्रशिक्षण देणार आहेत. या प्रशिक्षण शिबिराला उपस्थित राहण्यासाठी, जिल्हयातील नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळतोय. ज्या नागरिकांना या शिबिरात सहभागी व्हायचे आहे, त्यांनी ९२८४१२७४ ७९ या क्रमांकावर संपर्क साधून नाव नोंदणी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
Leave a Reply