
कोल्हापूर: कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ लि.,कोल्हापूर(गोकुळ) म्हैस दूध वाढ कृती कार्यक्रम अंतर्गत संघाचे म्हैस दूध वाढ होणेसाठी कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक यांचे मार्फत अण्णासाहेब पाटील, महात्मा फुले मागासवर्गीय विकास, लोकशाहीर आण्णाभाऊ साठे विकास, इतर मागासवर्गीय, वसंतराव नाईक व्ही.जी.एन.टी., संत रोहिदास विकास या सर्व महामंडळा अंतर्गत म्हैस कर्ज प्रकरण योजना राबविण्याल्या जात आहेत. त्यासंदर्भातील विस्तृत माहिती तसेच संस्था पातळी वरील येणाऱ्या अडचणीबाबत आज गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे, के.डी.सी बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैय्या माने, गोकुळचे संचालक यांच्या उपस्थितीत संघाचे व बँकेचे अधिकारी यांची गोकुळच्या ताराबाई पार्क कार्यालय येथे संयुक्त मिटिंग झाली .यावेळी बोलताना के.डी.सी बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैय्या माने म्हणाले कि, बँकेमार्फत जातिवंत म्हैस खरेदी योजना अधिक सक्षमपणे राबविणार असून कोल्हापूर जिल्ह्यातील दूध उत्पादन क्षेत्रामध्ये संधी विचारात घेता जिल्ह्यातील अल्पभूधारक शेतकरी व भूमिहीन शेतमजुरांना आर्थिक लाभ करून देणारा व्यवसाय आहे स्वयंरोजगाराची निर्मिती करणे करता जिल्ह्यातील दुध उत्पादकांकडून म्हैस संकलन वाढावे यासाठी विविध महामंडळाच्या माध्यमातून जातिवंत म्हैस खरेदीकर्ज योजनेच्या माध्यमातून ५०० कोटी रुपये राखीव ठेवले असून आज पर्यंत सरासरी म्हैस खरेदी कर्ज प्रकरणाने ८२ कोटी रुपयाचे वाटप करण्यात आले आहे. ते वाढवण्याच्या दृष्टीने प्रयत्नशील राहू असे मनोगत व्यक्त केले. या कर्ज प्रकरणासंबंधी संघाचे तसेच बँकेची पदाधिकारी यांच्यामध्ये समन्वय साधून हि योजना अधिक प्रभावीपणे राबविणार असल्याचे मनोगत व्यक्त केले. म्हैस कर्ज प्रकरण प्रती जनावर खरेदी रक्कम १ लाख ऐवजी ती वाढवून देणे बाबतचा बँकेच्या संचालक मंडळाच्या मीटिंगमध्ये घेतला जाईल असे आश्वासन दिले.
Leave a Reply