
कोल्हापूर/प्रतीनिधी: शनिवार दिनांक १९ ऑगस्ट या जागतिक छायाचित्र दिनानिमित्त कोल्हापूर प्रेस क्लब व कोल्हापूर फोटोग्राफर्स यांच्यावतीने अवतीभवती छायाचित्रांचे प्रदर्शन राजर्षी शाहू स्मारक भवन येथे सकाळी दहा ते आठ या वेळेत भरविण्यात येणार आहे. यामध्ये कोल्हापूर शहरातील वृत्तपत्र छायाचित्रकारांनी काढलेल्या छायाचित्रांचा समावेश असणार आहे. याचे उद्घाटन श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांच्या हस्ते शनिवारी १९ तारखेला सकाळी अकरा वाजता होणार आहे. यावेळी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर व माजी गृहराज्यमंत्री आमदार सतेज उर्फ बंटी पाटील यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
तसेच यावर्षी चा ज्येष्ठ प्रेस फोटोग्राफर जॉनी ट्रेनर स्मृती जीवनगौरव पुरस्कार सुनील तथा राजा गोपाळ उपळेकर यांना देण्यात येणार आहे. त्याचबरोबर नवोदित छायाचित्रकारासाठी चर्चासत्राचे आयोजन केले आहे. यामध्ये ज्येष्ठ छायाचित्रकार रघु जाधव, प्रॉडक्ट व इंडस्ट्रियल छायाचित्रकार संजय चौगुले, वेडिंग छायाचित्रकार ऋषिकेश भांबुरे, सिनेमॅटिक छायाचित्रकार शुभम चेचर मार्गदर्शन करणार आहेत.अशी माहिती प्रेस क्लबचे अध्यक्ष शीतल धनवडे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. यावेळी उपाध्यक्ष प्रशांत आयारेकर, बी. डी. चेचर, आदित्य वेल्हाळ, मोहन मेस्त्री, पप्पू आत्तार, नसीर अत्तार, मोलोजी केरकर, शशिकांत मोरे, संजय देसाई, नाज ट्रेनर आदीसह सर्व मिडियाचे छायाचित्रकार उपस्थित होते.सकाळच्या सत्रात कार्यक्रमाचे
उद्घाटन, जीवनगौरव वितरण तर दुपारच्या सत्रात चर्चासत्र होणार आहेत.दिवंगत जॉनी ट्रेनर हे वृत्तपत्र छायाचित्र क्षेत्रातील प्रसिद्ध नाव होते. दै.पुढारी मधून काम करताना त्यांनी सुमारे ३५ वर्षे फोटोग्राफर म्हणून आपला दबदबा निर्माण केला होता.
तिलारी भुकंप, लखनौ उत्तर प्रदेश, १९८९ चा महापूर यात विशेष कामगिरी केली होती.
व्यावसायिक फोटोग्राफर चे ब्लॅक व्हाइट फोटो प्रिंट करून देण्यात त्यांचा हातखंडा होता.अशा सर्व फोटोग्राफर सोबत जिव्हाळ्याचे संबंध असलेल्या जॉनी ट्रेनर यांच्या नावे ‘जॉनी ट्रेनर स्मृती जीवन गौरव’ या पुरस्कारराने राजा उपळळेकर (ज्येष्ठ फोटोग्राफर) सन्मानीत करण्यात येणार आहे. शाल श्रीफळ आणि सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे हे छायाचित्रांचे प्रदर्शन १९ ते २५ ऑगस्ट दरम्यान सकाळी दहा ते सायंकाळी आठ वाजेपर्यंत सर्वांसाठी विनामूल्य असणार आहे. तरी या प्रदर्शनास जास्तीत जास्त लोकांनी भेट द्यावी असे आवाहन यावेळी करण्यात आले.
Leave a Reply