
कोल्हापूर: रविवारी दि. १० कोल्हापुरात तपोवन मैदानावर एक लाखाहून अधिक कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये उत्तरदायित्व सभा होईल. उच्चांकी गर्दीमुळे संपूर्ण महाराष्ट्रात रेकॉर्ड ब्रेक सभा करू, असा विश्वास वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केला. या सभेला २५ हजारांहून अधिक माता -भगिनी उपस्थित असतील. या सभेला कागल, गडहिंग्लज व उत्तुर विधानसभा मतदारसंघातून ३० ते ३५ हजार कार्यकर्ते उपस्थित राहतील, असेही ते म्हणाले.कोल्हापुरात रविवारी दि. १० होणाऱ्या उत्तरदायित्व सभेच्या नियोजनासाठी आयोजित कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात मंत्री श्री. मुश्रीफ बोलत होते.भाषणात मंत्री श्री. मुश्रीफ पुढे म्हणाले, ही उत्तरदायित्व सभा कुणाशीही इर्षा नाही. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे कामाचा माणूस आहेत. कोल्हापूर शहर आणि जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी फार मोठे योगदान दिलेले आहे. परंतु; काही प्रश्न अजूनही प्रलंबित आहेत. त्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी उत्तरदायित्व घेण्याची ही सभा आहे. कोल्हापूर शहराच्या थेट पाईपलाईनसह न्यायालयाची इमारत, जिल्हाधिकारी कार्यालयाची इमारत, शासकीय राजाराम महाविद्यालय, शिवाजी विद्यापीठ, श्री. अंबाबाई तीर्थक्षेत्र विकास आराखडा, रंकाळा तलाव संवर्धन, श्री. जोतिबा तीर्थक्षेत्र विकास आराखडा, केशवराव भोसले नाट्यगृह नूतनीकरण, नगरोत्थान योजनेतून रस्ते विकास प्रकल्प यामध्ये अजितदादांचे योगदान मोठे आहे.
Leave a Reply