
कोल्हापूर : जिल्ह्यातील जनसंवाद यात्रेच्या आजच्या दुसऱ्या दिवसाला गडहिंग्लज तालुक्यातील इंचनाळ येथून उत्साहात सुरुवात झाली..तत्पूर्वी गिजवणे येथून कार्यकर्त्यांनी जल्लोषात मोटारसायकल रॅली काढली.आजरा तालुक्यात जनसंवाद पदयात्रेस उत्साही सुरुवात झाली.छत्रपती शिवाजी महाराज व सरसेनापती प्रतापराव गुजर यांना अभिवादन करून आजरा तालुक्यात जनसंवाद पदयात्रेच्या दुसऱ्या टप्प्यास मोठ्या उत्साहात सुरुवात करण्यात आली.ढोल-ताशे-हलगी या पारंपारिक वाद्यांच्या निनादात पदयात्रेचे स्वागत करण्यात आले. यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांसह शेतकरी, महिला-भगिनी, युवा सहकारी असे लहानांपासून थोरांपर्यंत सर्वजण पदयात्रेत उत्स्फूर्तपणे सहभागी झाले. यात्रेच्या मार्गात गावागावात लोकांनी केलेले स्वागत उत्साह वाढविणारे होते.
आजरा तालुक्यातील जनतेच्या उत्साही प्रतिसादात १० किलोमीटरचा दुसरा टप्पा पार पडला.यात्रेस मिळणारा प्रतिसाद मनोबल द्विगुणित करणारा आहे.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसतर्फे संपूर्ण महाराष्ट्रात जनसंवाद पदयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. या पदयात्रेला कोल्हापूर जिल्ह्यामध्ये चंदगड तालुक्यातील तांबुळवाडी येथे आज मोठ्या उत्साहात सुरुवात झाली. देशातील सध्याचे द्वेषाचे, हिंसेचे वातावरण बदलून प्रेम, शांतीचे आवाहन करणाऱ्या या पदयात्रेच्या प्रारंभ प्रसंगी काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते, शेतकरी, महिला व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. पदयात्रेच्या पहिल्या दिवशी २४ किलोमीटरचा टप्पा पूर्ण करण्यात आला. समता आणि पुरोगामित्वाचा संदेश देणाऱ्या राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या जिल्ह्यात जनसंवाद पदयात्रेस मिळालेला हा प्रतिसाद बदलाची साक्ष देणारा आहे.
तसेच जालना येथे मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीमाराच्या निषेधार्थ गडहिंग्लज येथे सकल मराठा समाजाच्या वतीने बंद पुकारण्यात आला होता. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज चौकात या आंदोलकांची भेट घेऊन जिल्हा काँग्रेसच्या वतीने या बंदला पाठिंबा दिला.तसेच या आंदोलनाला पाठिंबा म्हणून काँगेसच्या जनसंवाद यात्रेचा गडहिंग्लज शहरातील टप्पा रद्द केला.जनतेच्या प्रश्नांसाठी, महागाई बेरोजगारी भ्रष्टाचार आणि भाजपच्या दंगलीच्या राजकारणाविरोधात काँग्रेस रस्त्यावर उतरली आहे.
जनसंवाद यात्रेस प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. आमदार बंटी पाटील यांच्या नेतृत्वाखाली चंदगड तालुक्यात जनसंवाद पदयात्रा उत्साहात सुरूवात झाली.
Leave a Reply