
कोल्हापूर: सकल मराठा समाज कोल्हापूर यांच्यावतीने महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दौऱ्यामध्ये आंदोलनाची घोषणा केली होती. आज सकाळी कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर व मंत्री हसन मुश्रीफ तसेच जिल्हा पोलीस प्रमुख यांच्याबरोबर सकल मराठा समाज यांच्या बैठकीमध्ये झालेल्या चर्चा व आश्वासनाने पालकमंत्री दीपक केसरकर यांनी 19 सप्टेंबर म्हणजे गणेश जयंतीपूर्वी मुंबई येथे मंत्रालयामध्ये सकल मराठा समाज आरक्षणाबाबत तात्काळ बैठक लावण्याचे आश्वासन दिल्यामुळे सर्वानुमती घेतलेल्या निर्णयानुसार दिनांक 10 सप्टेंबर रोजी पुकारलेले आंदोलन स्थगित करत आहोत.याबाबत सरकारकडून दिलेला शब्द जर नाही पाळला तर तीव्र आंदोलन छेडले जाईल याची नोंद घ्यावी.सकल मराठा समाजाच्या बैठकीस वसंतराव मुळीक, आर के पवार , बाबा पार्टे, रविकिरण इंगवले, सुनील मोदी, बाबा इंदुलकर, अनिल घाडगे, धनंजय सावंत, शाहीर दिलीप सावंत, सुशील भांदिगिरे, मयूर पाटील, काका पाटील, काका जाधव, अमर निंबाळकर इत्यादी उपस्थित होते.
Leave a Reply