
कोल्हापूर: मध्यवर्ती कोल्हापूर शहराचा उत्तर आणि दक्षिण भाग जोडणारे एकमेव ठिकाण म्हणजे ‘ बाबूभाई पारीख पूल’. हा पूल सद्यस्थितीत वाढलेल्या वाहतुकीमुळे अत्यंत असुरक्षित आणि धोकादायक झालेला आहे. पावसाळ्यात पाणी तुंबण्यामुळे होणारा खोळंबा आणि त्रास आपल्या सर्वांनाच माहिती आहे. याशिवाय रात्रीच्या वेळी या ठिकाणाहून प्रवास करणे अत्यंत असुरक्षित आहे.रेल्वे खात्याच्या लेखी हा पूल म्हणजे ‘फक्त पाणी जाण्याचा मार्ग आहे’ जो वाहतूक रहदारीसाठी अधिकृत नाही. याची माहिती रेल्वेने प्रशासनाने पालिकेला वारंवार दिली असून महानगरपालिका प्रशासन याकडे दुर्लक्ष करत आहे.रेल्वे खात्याने हा पूल जर वाहतुकीसाठी बंद केला तर आपण सामान्य नागरिकांनाच याचा मोठ्या प्रमाणात त्रास होणार आहे. (राजारामपुरी मधून स्टेशन रोड ला जायचे असेल तर शाहूपुरी- गोकुळ हॉटेल किंवा स्टार बझार उड्डाण पूल मार्गे कावळा नाका)हे सर्व लक्षात घेऊन पारीख पूल नूतनीकरण समिती यांच्या समन्वयाने आमचे मित्र शाहू विचारक फिरोज शेख यांनी यासाठी आंदोलन छेडले असून, या पुलाच्या समोरच आज रोजी भर पावसात, जमिनीवर बसून हे बारा तासांचे ‘अन्न पाणी त्याग’ आंदोलन सुरू आहे.जास्तीत जास्त लोकांनी या आंदोलनाच्या ठिकाणी भेट द्यावी व आपले नांव व स्वाक्षरी तेथील वहीमध्ये नोंद करून या आंदोलनाला पाठींबा द्यावा. असे आवाहन यावेळी करण्यात आले आहे.
Leave a Reply