हिंदू धर्म संघटनांच्यावतीने श्रावण व्रत वैकल्य उपक्रम

 

कोल्हापूर : कोल्हापुरातील समस्त हिंदुत्ववादी संघटना व आमदार राजेश क्षीरसागर फौंडेशनच्या वतीने हिंदू धर्मात पवित्र मानल्या जाणाऱ्या श्रावण महिन्यानिमित्त श्रावण महिन्याच्या चौथ्या सोमवारी म्हणजेच दि. ११ सप्टेंबर रोजी सायं. ६ ते रात्री १० या वेळेत “नष्टे लॉन, महावीर गार्डन जवळ, कोल्हापूर” येथे “श्रावण व्रत वैकल्य” या सामुदायिक उपवास सोडण्याच्या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. याबाबत आज शिवालय, शिवसेना जिल्हा मध्यवर्ती कार्यालय, कोल्हापूर येथे समस्त हिंदू धर्म संघटनांच्या प्रमुख पदाधिकारी यांची पत्रकार परिषद पार पडली श्रावण व्रतवैकल्य कार्यक्रमाकरिता कमलाकर किलकिले सकाळी कावडीने पंचगंगा नदी तीरावरून कावडीने पाणी आणणार आहेत. या कार्यक्रमाची सुरवात कमलाकर किलकिले यांनी पवित्र पंचगंगा नदी तीरावरून आणलेल्या जलाने श्री महादेवाच्या पिंडीस आणि छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेस जलाभिषेकाने होणार आहे. यानंतर गोमाता पूजन, ध्वजवंदन आणि शस्त्रपूजन होणार आहे. यानंतर अकरा नवदाम्पत्यांच्या उपस्थितीत यज्ञास सुरवात होणार आहे. याकरिता हिंदू धर्मातील अनेक जातीपंतातील मान्यवर यजमान उपस्थित असणार आहेत.  ३५० व्या शिवराज्याभिषेक वर्षानिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांची आरती करण्यात येणार आहे. या कार्यक्रमामध्ये एकाचवेळी सर्वच जातीपंतातील १०८ दाम्पत्य केळीच्या पानांवर मंत्र घोषात सात्विक भोजनाद्वारे आपला उपवास सोडतील. तर या कार्यक्रमास सुमारे पाच हजार हिंदू जन उपस्थित राहतील. यावेळी एस्कोन भजनी मंडळाचा जप आणि भजनाचा कार्यक्रमही आयोजित केला आहे.कार्यक्रमस्थळी भगवान श्रीकृष्ण, भारतमाता, स्वामी विवेकांनद, स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह अनेक देवतांच्या प्रतिकृती असणार आहेत. त्याचबरोबर भोजन मंडपामध्ये हिंदू धर्माचे मार्गदर्शनपर बोधावाक्यांचे फलक लावणेत येणार आहेत. या कार्यक्रमास हिंदू धर्मातील सर्व पोटजाती, बारा बलुतेदार, जमाती यांच्या प्रतीनिधीसह सर्व प्रमुख मंदिरातील प्रमुख उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाच्या माध्यमातून शहरासह जिल्ह्यातील सर्वच क्षेत्रातील हिंदूजणांना व घटकांना एकत्र आणण्यासाठी व हिंदू धर्माचा वसा जपण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन केले असून, शहरातील तालीम संस्था, मंडळाचे कार्यकर्ते, समस्त नागरिक आणि हिंदू जणांनी उपस्थित राहावे, असे आवाहनही समस्त हिंदू धर्म संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे.या पत्रकार परिषदेस महादेवजी यादव महाराज, बाबा वाघापूरकर, अॅड.सुधीर जोशी वंदूरकर, श्रीकांत पोतनीस, चंद्रकांत बराले, संभाजी उर्फ बंडा साळुंखे, मधुकर नाझरे, उदय भोसले, किशोर घाटगे, कमलाकर किलकिले, संजय साडविलकर, शिवानंद स्वामी, गजानन तोडकर, दीपक देसाई, नंदू घोरपडे, मनोहर सोरप, अशोक देसाई, पराग फडणीस, महेश उरसाल, सुनील पाटील, अॅड.देवेंद्र रासकर, अशोक रामचंदानी आदी हिंदुत्ववादी संघटनांचे आदी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!