
कोल्हापूर : भर पावसातही काँग्रेसच्या जनसंवाद यात्रेस भरभरून प्रतिसाद मिळाला. शहरातील मुख्य रस्त्यांवरून आज या यात्रेची सांगता दसरा चौकात सभेने झाली. सभेत आमदार सतेज पाटील यांनी भाजप सरकारवर कडाडून टीका केली. सध्या अमृतकाळ सुरू आहे असं म्हणणाऱ्या भाजपने महागाईचा कहर केला आहे. चारशे रुपयाचे गॅस सिलेंडर अकराशे रुपयाला आज मिळत आहे. आणि दोनशे रुपयांनी कमी केले. त्यावर महागाई कमी केल्याचा दावा भाजप व युती सरकार करत आहे. निवडणुका जवळ आल्या की दर कमी करायचे आणि निवडणुका झाल्यानंतर पुन्हा वाढवायचे हे भाजपचे धोरण आहे. जात धर्मामध्ये तेढ वाढवून भाजप राजकारण करत आहे. असे टीकास्त्र आमदार सतेज पाटील यांनी भाजप सरकारवर सोडले.शहरातील आपटेनगर परिसरातून भर पावसामध्ये सुरुवात झालेल्या जनसंवाद पदयात्रेस कोल्हापूर दक्षिण (शहर) आणि कोल्हापूर उत्तर या भागात कोल्हापूरच्या स्वाभिमानी जनतेने जोरदार प्रतिसाद दिला.पदयात्रा मार्गावर ठिकठिकाणी फुले उधळून,औक्षण करून माता भगिनी, युवा पिढी आणि कार्यकर्त्यांनी केलेले स्वागत ऊर्जा देणारे होते .दसरा चौक येथील संवाद सभेस उपस्थित असणारा विराट जनसमुदाय द्वेषाच्या राजकारणाच्या विरोधात कोल्हापूरकर एकजुटीने उभे असल्याची खात्री देणारा होता.
Leave a Reply