शाहूवाडी तालुक्यातील जनसंवाद पदयात्रेस जोरदार प्रतिसाद

 

कोल्हापूर: शाहूवाडी तालुक्यातील सुपात्रे येथील मारुती मंदिरापासून सुरु झालेल्या जनसंवाद पदयात्रेस जोरदार प्रतिसाद मिळाला. सर्वसामान्य नागरिक उत्स्फूर्तपणे पुढे येऊन पदयात्रेचे सहभागी होत होते. महिला पायावर पाणी घालून यात्रेचे स्वागत करत होत्या. युवक-युवती, शेतकरी बांधव मोठ्या संख्येने पदयात्रेत सामील झाले होते.ठमकेवाडी फाटा येथील राधे-कृष्ण मंगल कार्यालयात संपन्न झालेल्या संवाद सभेस नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष व विधानपरिषदेचे गट नेते आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यात सुरू असलेली जनसंवाद पदयात्रा आज मंगळवारी शाहूवाडी तालुक्यात पोहोचली. शाहुवाडी तालुक्यातील सुपात्रे येथून या गावातून जनसंवाद पदयात्रेला सुरवात झाली. गोकुळचे संचालक कर्णसिंह गायकवाड, सुपात्रेच्या सरपंच दिपाली संदीप हांडे, माजी सरपंच मधुकर हांडे, माजी सभापती पंडीतराव नलवडे माजी ग्रामपंचायत सदस्य शशिकांत हांडे, रंगराव फडतारे, बाबासो पाटील यांच्यासह गावातील मान्यवरांच्या उपस्थितीत या पदयात्रेला सुपात्रे येथून सुरुवात करण्यात आली. सुपात्रे, खुटाळवाडी, डोणेली, बांबवडे, ठमकेवाडी या मार्गावरून ही जनसंवाद पदयात्रा काढण्यात आली.. खुटाळवाडी याठिकाणी पद यात्रा आल्यानंतर खुटाळवाडीचे माजी सरपंच विलास खुटाळे, सतीश बाचंनकर, ग्रामपंचायत सदस्य दत्तात्रय खडके, नारायण व्हरकत, छाया खुटाळे यांच्यासह ग्रामस्थांनी पदयात्रेचे स्वागत केले. तर डोनोली येथे उपसरपंच संदीप शेळके, माजी उपसरपंच बाबुराव शेळके, डी.पी शिंदे, विनोद शेळके, डॉ राजू कांबळे, चंद्रकांत शेळके, विलास शेळके , यांच्यावतीन स्वागत करण्यात आले. दरम्यान बांबवडे या ठिकाणी शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या वतीने माजी आमदार सत्यजित पाटील सरुडकर, बांबवडेचे सरपंच भगतसिंह चौगले, जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती हंबीरराव पाटील, माजी पंचायत समिती सभापती एन.डी. पाटील, अमरसिंह पाटील, माजी पंचायत समिती सदस्य जालिंदर पाटील, शिवसेना उपजिल्हाप्रमुख नामदेव गिरी, भेडसगावचे सरपंच अमर पाटील, माजी सभापती दिलीप पाटील यांच्यासह ठाकरे गट शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या उत्साहात या यात्रेच स्वागत करून आमदार सतेज पाटील यांना शुभेच्छा दिल्या. त्याचबरोबर गोकुळचे संचालक कर्णसिंह गायकवाड यांच्या गटाच्या वतीने देखील बांबवडे येथे स्वागत करण्यात आले. या ठिकाणी कर्णसिंह गायकवाड गटाच्या कार्यकर्त्यांनी आणि बांबवडेचे माजी सरपंच विष्णू यादव यांनी जेसीबीतून जनसंवाद पदयात्रेवर पुष्पवृष्टी करत स्वागत केले. या पदयात्रेला ठिकठिकाणी उस्फूर्त प्रतिसाद मिळाला. हातात काँग्रेसचे झेंडे घेऊन अनेक कार्यकर्ते उत्स्फूर्तपणे या जनसंवाद पदयात्रेत सहभागी झाले होते. या पदयात्रे दरम्यान आमदार सतेज पाटील यांनी नागरिकांशी संवाद साधून त्यांचे प्रश्न देखील जाणून घेतले. या पदयात्रेत जिल्हा परिषदेचे माजी सदस्य विजय बोरगे, काँग्रेस कमिटीचे माजी राष्ट्रीय सचिव बाजीराव खाडे, माजी पंचायत समिती सदस्य बाळासाहेब गद्रे, गोकुळचे संचालक बाबासो चौगले, बयाजी शेळके, प्रकाश पाटील, यांच्यासह शाहूवाडी तालुक्यातील काँग्रेस, ठाकरे गट शिवसेना राष्ट्रवादी शरद पवार गटाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते राधाकृष्ण मंगल कार्यालयात जाहीर सभा झाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!