
कोल्हापूर: आज करवीर तालुक्यातील जनसंवाद पदयात्रेत आ.पी.एन.पाटील सहभागी झाले होते. युवक-युवती,महिला भगिनी, शेतकरी बांधव यांच्या मोठ्या प्रतिसादात पदयात्रा संपन्न झाली. वडणगे (ता. करवीर) येथील पार्वती मंदिर चौक येथे काँग्रेसचे वरिष्ठ नेते आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्या उपस्थितीत संवाद सभेचे आयोजन करण्यात आले होते. आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी कोल्हापूर जिल्ह्यात जनसंवाद पदयात्रा अत्यंत चांगल्या प्रकारे पार पडल्याचे सांगून यशस्वी संयोजनाबद्दल कौतुक केले.आठ दिवसांत आठ तालुके, ९ मतदारसंघातून सुमारे १०२ किलोमीटर इतके अंतर पदयात्रेने पूर्ण केले आहे. यात्रेला मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा प्रेमाचा संदेश सामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्यात कोल्हापूर जिल्ह्यात जनसंवाद यात्रा यशस्वी झाल्याची खात्री वाटते. तसेच भाजप विरोधात असणारा असंतोष या पदयात्रेच्या निमित्ताने व्यक्त झाला असे मत आमदार सतेज पाटील यांनी व्यक्त केले.
Leave a Reply