
कोल्हापूर / प्रतिनिधी : कोल्हापुरातील प्रतिभा नगर येथील साई स्पा स्टुडिओ अँड ब्युटी पार्लर या संस्थेच्यामार्फत कोल्हापूर जिल्ह्यातील अनाथ व गरजू मुलींसाठी बेसिक ब्युटी कोर्स सुरू करण्यात येणार आहे. हा ब्युटी कोर्स पूर्णतः मोफत असून ज्या महिला एकट्या आहेत किंवा ज्यांच्यावर घरची जबाबदारी आहे त्यांच्या उदरनिर्वाहासाठी किंवा ज्यांना स्वतःचा व्यवसाय सुरू करणार करायचा आहे. त्यांच्यासाठी अतिशय उपयुक्त ठरणार आहे. कोर्स पूर्ण केल्यानंतर त्यांना शासनमान्य संस्थेचे अधिकृत प्रमाणपत्र देण्यात येणार आहे, अशी माहिती संस्थेच्या प्रमुख श्रद्धा मोरे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. यासाठी नाव नोंदणी आवश्यक आहे. ब्युटी पार्लरशी संबंधित सर्व ट्रीटमेंटची आवश्यक माहिती व प्रशिक्षण या कोर्समध्ये दिले जाणार आहे. तरी प्रतिभा नगर, गुडाळे हाईट्स, रेड्याच्या टकरी जवळ किंवा 9657191006 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन श्रद्धा मोरे यांनी केल आहे.
Leave a Reply