कोल्हापूरच्या विकासासाठी मुख्यमंत्र्यांबरोबर बैठक घेण्याची उद्योगमंत्री उदय सामंत यांची ग्वाही : क्रीडाईच्या दालन प्रदर्शनाचे शानदार उद्घाटन

 

कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापूर जिल्ह्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्यासमवेत तातडीची बैठक घेऊन निर्णय घेतले जातील, अशी ग्वाही उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली . ते आज कोल्हापुरातील क्रीडाईच्या दालन-२०२४ या प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते . कोल्हापुरातील सर्व प्रलंबित प्रश्न मार्गी लावून, कोल्हापूरला न्याय दिला जाईल असे त्यांनी सांगितले यावेळी पालकमंत्री हसन मुश्रीफ, आमदार सतेज पाटील आणि आमदार जयंत आसगावकर यांनी कोल्हापुरातील विविध प्रश्नांची मांडणी केली .

गेल्या ३५ वर्षांपासून कोल्हापुरातील बांधकाम व्यावसायिक तसंच अभियंत्यांची क्रिडाई कोल्हापूर , ही संस्था कार्यरत आहे . या क्रीडाई कोल्हापूरच्यावतीने १९९२ सालापासून बांधकामविषयी प्रदर्शनाची सुरुवात करण्यात आली आहे . क्रिडाई कोल्हापूरच्यावतीनं पश्चिम महाराष्ट्रातील भव्य वास्तू आणि बांधकामविषयक दालन २०२४ या प्रदर्शनाचे आयोजन महासैनिक दरबार हॉलच्या मैदानावर ९ ते १२ फेब्रुवारी २०२४ या दरम्यान आयोजित करण्यात आले आहे .कोल्हापूर आणि परिसरातील ग्राहकांना एकाच छताखाली वेगवेगळ्या ठिकाणचं बांधकाम तसच ईमारत साहित्यविषयक नवीन प्रोजेक्ट उपलब्ध होणाऱ्या या प्रदर्शनाचे उद्घाटन, आज उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते, पालकमंत्री हसन मुश्रीफ, आमदार सतेज पाटील, आमदार जयंत आसगावकर यांच्यासह क्रिडाईचे पदाधिकारी आणि उद्योजक तसच व्यावसायिकांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले .
सुरुवातीला आमदार सतेज पाटील यांनी या प्रदर्शनातील विविध स्टॉल्स तसच बँक आणि फायनान्स कंपन्यांच्या स्टॉल्सना भेटी दिल्या . यावेळी आमदार सतेज पाटील यांचे स्वागत करण्यात आले . त्यानंतर पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते या प्रदर्शनाच्या प्रवेशद्वाराजवळील फीत कापून प्रदर्शनाच्या दालनामध्ये प्रवेश करण्यात आला . उद्योगमंत्री उदय सामंत, पालकमंत्री हसन मुश्रीफ, आमदार सतेज पाटील, आमदार जयंत आसगावकर, यांच्यासह मान्यवरांचे स्वागत करण्यात आले .त्यानंतर दीप प्रज्वलन करण्यात आले. दालन २०२४ चे चेअरमन चेतन वसा , क्रिडाई महाराष्ट्राचे उपाध्यक्ष राजेंद्र यादव, आमदार जयंत आसगावकर यांनी मनोगते व्यक्त केली . किडाईने कोल्हापूर जिल्ह्यातील पूर, कोविड अशा विविध संकटांच्या काळात नेहमीच मदत केली आहे. या क्रीडाई संस्थेचे कार्य राज्यासह देशात चांगल्या पद्धतीने सुरू असल्याने या संस्थेच्या कार्याचे कौतुक आमदार सतेज पाटील यांनी यावेळी बोलताना केले. कोल्हापूर शहरात ९० लाख स्क्वेअर फुटांच्या अंतरामध्ये बांधकामाना परवानगी मिळाली आहे .२०३० सालापर्यंत दीड कोटी स्क्वेअर फुटामध्ये ही बांधकाम होतील, त्यामुळ इथल्या रहिवाशांना पाणीपुरवठा ,ड्रेनेज आणि लाईटची व्यवस्था करण गरजेच आहे . त्यासाठी त्यांना सर्व सुविधा उपलब्ध करून देण आवश्यक असल्याच आमदार सतेज पाटील यांनी यावेळी सांगितले . कोल्हापुरात लवकरात लवकर आयटी पार्क उभारण गरजेचे असून मगरपट्ट्याप्रमाने ५० लोक एकत्र येऊन, प्रत्येकी पाच लाख अशी रक्कम उभारून आयटी पार्कची उभारणी केली पाहिजे, असे त्यांनी सांगितले . कोल्हापुरला पूर्णवेळ सहाय्यक संचालक नगररचना, ही पदे भरली पाहिजेत असेही त्यांनी सांगितले . क्रिडाई संस्थेबरोबर सर्वांनी एकत्रित मिळून कोल्हापूर जिल्ह्याला पुढे नेण्यासाठी प्रयत्न करू .त्यासाठी सर्वतोपरी सहकार्य केल जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली . या नंतर क्रिडाईचे उपाध्यक्ष सचिन ओसवाल यांनी मनोगत व्यक्त केले . क्रिडाई कोल्हापूरचे अध्यक्ष के . पी . खोत यांनी कोल्हापुरात रेरा कायद्याची आवश्यकता नसल्याचे सांगितले . कोल्हापूर जिल्ह्यात सहाय्यक संचालक नगर रचनाची ६ पद रिक्त आहेत, ती भरावीत, रिकाम्या जागेला घरफाळा लाऊ नये ,मुख्यमंत्री कोठ्यातील राखीव फ्लॅटच्या विक्रीला परवानगी मिळावी, रस्ते विकसित करावेत, बांधकाम व्यवसायाला उद्योगाचा दर्जा मिळावा, कोल्हापुरात मुंबई उच्च न्यायालयाच खंडपीठ व्हावं, यासह विविध मागण्या यावेळी केल्या . यावेळी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष ललित गांधी यांनी कोल्हापूर जिल्ह्यात मोठा उद्योग प्रकल्प उभारावा, अशी मागणी केली .
देशाच्या वृद्धी दरामध्ये बांधकाम व्यवसायिकांचा मोठा वाटा आहे . आपल्या देशाला तिसऱ्या स्थानावर आणण्यासाठी सर्वच बांधकाम व्यवसायिकांचा हातभार लागत आहे, असं प्रतिपादन यावेळी बोलताना पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले . बांधकामाबरोबर सर्व सुविधा कोल्हापुरात उपलब्ध करण गरजेच असल्याच त्यांनी सांगितले .सहाय्यक संचालक नगर रचनाचे अधिकारी उपलब्ध होत नसल्याने,बांधकाम व्यवसायिकांना त्रास होत असून, या सहाय्यक संचालक नगर रचना विभागातील पदे भरावीत, असे त्यांनी सांगितले . क्रिडाईचे कार्य मोलाचे असून या संस्थेच्या सर्व मागण्या मान्य केल्या जातील . मात्र बांधकाम व्यवसायिकांनी घर विकत घेणाऱ्यांचाही विचार करावा असे यावेळी बोलताना उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सांगितले . आमचे सरकार केवळ आश्वासने देत नाही तर दिलेली वचने पाळत असल्याचे त्यांनी सांगितले . कोल्हापूर जिल्ह्यातील पंचगंगा शुद्धीकरण, रस्ते, पाणी ऐतिहासिक स्थळ यांचा विकास केला जाईल असेही त्यांनी नमूद केले . पंचगंगेचे शुद्धीकरण करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक आराखडा तयार केला आहे त्याप्रमाणे काम करून पुढील पन्नास वर्षांमध्ये पंचगंगा नदीचे प्रदूषण होणार नाही, असे नियोजन करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. कोल्हापुरात मुंबई उच्च न्यायालयाच खंडपीठ होण्यासाठी प्रयत्नशील असल्याच त्यांनी सांगितले .विकास कामांसाठी कोल्हापुरातील सर्व राजकीय पक्ष एकत्रित येतात .हा आदर्श महाराष्ट्रासह देशान घेतला पाहिजे, असेही ते म्हणाले . विकास करायचा असेल तर सर्वांनी खिलाडूवृत्तीन एकत्र येण गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले . कोल्हापूर जिल्ह्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमवेत तातडीची बैठक घेऊन, निर्णय घेतला जाईल . कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व प्रलंबित प्रश्न मार्गी लावले जातील, असे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सांगितले .यावेळी क्रिडाईचे उपाध्यक्ष सचिन ओसवाल, उपाध्यक्ष गौतम परमार, सचिव संदीप मिरजकर, खजानीस अजय डोईजड,दालन २०२४ चे व्हाईस चेअरमन प्रमोद साळोखे, समन्वयक अतुल पोवार ,सचिव गणेश सावंत, सहसचिव संग्राम दळवी, खजानीस श्रीधर कुलकर्णी, सहखजानीस उदय निचिते, क्रीडाई कोल्हापूरचे सर्व पदाधिकारी आणि सभासद तसच विविध क्षेत्रांतील मान्यवर मोठ्या संख्येनं उपस्थित होते. सचिव संदीप मिरजकर यांनी आभार मानले .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!