
कोल्हापूर/प्रतिनिधी : विधान परिषद सदस्य डॉ.मनीषाताई कायंदे यांच्या सुमारे १० लाख रुपये निधीतून करवीर तालुक्यातील सरनोबतवाडी इथे विकास कामांना प्रारंभ झाला आहे.चार सोलर पोल हाय मास्क लॅम्प लोकार्पण करण्यात आले आहे.
करवीर तालुक्यातील सरनोबतवाडी इथे रोहन चव्हाण सरकार यांच्या प्रयत्नातून आणि विधान परिषद सदस्य डॉ.मनीषाताई कायंदे यांच्या सुमारे १० लाख रुपये निधीतून विकास कामांना प्रारंभ झाला. या अंतर्गत चार सोलर पोल हाय मास्क लॅम्प सरनोबतवाडी इथल्या आदर्श तालीम,अमृत नगर, उजलाई कॉलनी या ठिकाणी बसवण्यात आल आहेत. यावेळी सागर गजबर, प्रेम भोसले, अमर शिंदे ,कुलदीप अडसुळे, निसार शेख ताजुद्दीन नायकवडे, सलीम मनेर, जहांगीर भाई शेख, संध्या गजबर, स्वाती गजबर , सविता शिंदे, शिल्पा प्रतागळे, व मनीषा भोसले यासह परिसरातील नागरिक उपस्थित होते.
Leave a Reply