
कोल्हापूर : कोल्हापूर जीतोच्या वतीने आयोजित अहिंसा रॅलीचे पोस्टर अनावरण मोठ्या उत्साहात आज झाले.शांतीचा संदेश देण्यासाठी गेल्या वर्षापासून जीतोच्या वतीने अहिंसा रॅलीचे आयोजन केले जाते. येत्या 31 मार्च रोजी दुसरी अहिंसा रॅली आयोजित केली आहे. त्याचे पोस्टर अनावरण जीतो अध्यक्ष गिरीश शहा, सचिव अनिल पाटील, जीतो महिला विंगच्या अध्यक्ष श्रेया गांधी, सचिव माया राठोड, अभिजित माने यांच्यासह सदस्यांच्या उपस्थितीत हॉटेल अयोध्या येथे उत्साहात करण्यात आले. श्री. शहा यांनी रॅलीविषयी विस्तृत माहिती, नियम लवकरच देऊ असे सांगितले. श्री. पाटील, गांधी, डॉ. रूपा शहा यांनी मार्गदर्शन केले.दरम्यान, अनिल पाटील व अभिजित माने यांनी आर्थिक साक्षरतेविषयी मार्गदर्शन केले. त्याचबरोबर महिलांच्या शंकांचे निरसनही केले.
Leave a Reply