पुणेकरांना सक्षम करण्यासाठी सीडीएसएल आयपीएफकडून गुंतवणूक जागरूकता आत्मनिर्भर निवेशक कार्यक्रम

 

पुणे : सीडीएसएल इन्व्हेस्टर प्रोटेक्शन फंड (CDSL IPF) ने पुण्यातील विविध संस्थांमध्ये गुंतवणूक जागृती कार्यक्रमांचे आयोजन केले होते.गुंतवणुकीची मूलभूत तत्त्वे या कार्यक्रमांच्या केंद्रस्थानी होती. यासोबतच योग्य आर्थिक निर्णय घेण्यासाठी उपस्थितांना आवश्यक माहिती देण्यात आली. कार्यक्रमातील वक्त्यांनी गुंतवणुकीच्या संकल्पना तसेच भांडवली बाजाराची माहिती सोप्या भाषेत आणि सहजरित्या मांडत उपस्थितांना योग्य मार्गदर्शन केले.असे गुंतवणूक जागृती कार्यक्रम विद्यार्थ्यांसाठी तसेच ग्रामीण भागातील किरकोळ गुंतवणूकदारांसाठी देखील राबवण्यात आले आहेत. या उपक्रमाचा फायदा बहुसंख्य प्रेक्षकांना व्हावा यासाठी हा कार्यक्रम मराठी, इंग्रजी आणि हिंदीमध्ये आयोजित करण्यात आला होता.भांडवली बाजारात गुंतवणूकदाराचे आर्थिक समावेशन योग्यरित्या होण्यासाठी त्यांचे योग्य प्रशिक्षण महत्त्वाचे आहे. त्यामुळेच CDSL IPF चे उद्दिष्ट भांडवली बाजारातील गुंतागुंत आत्मविश्वासाने सोडवण्यासाठी तसेच #आत्मनिर्भरनिवेशक होण्यासाठी सक्षम करणे हे आहे.आर्थिक साक्षरतेचा प्रसार करण्यासाठी वचनबद्ध असलेले CDSL IPF यंदा देशभरात अधिकाधिक गुंतवणूकदार जागरूकता कार्यक्रम आयोजित करेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!