‘सतेज मॅथ्स स्कॉलर’मुळे अभियांत्रिकीचा पाया भक्कम होईल : देवश्री पाटील

 

कोल्हापूर : साळोखेनगर येथील डी.वाय.पाटील इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये घेण्यात आलेली सतेज मॅथ्स स्कॉलर परीक्षा म्हणजे विद्यार्थ्यांना गणित विषयाची आवड निर्माण करणारी असून त्यामुळे विद्यार्थ्यांना भविष्यामध्ये याचा नक्कीच फायदा होईल. यातून विद्यार्थ्यांची गणित विषयाबद्दलची भीती कमी होऊन त्याबाबत सकारात्मक दृष्टिकोन वाढेल आणि विद्यार्थ्यानाचा अभियांत्रिकीचा पायाही मजबूत होईल असा विश्वास डी. वाय.पाटील ग्रुपच्या विश्वस्त देवश्री सतेज पाटील यांनी केले.डी.वाय.पाटील कॉलेज ऑफ इंजीनिअरिंग साळोखेनगर येथे सतेज मॅथ्स स्कॉलर परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांच्या बक्षीस वितरण समारंभात त्या बोलत होत्या. या वेळी डी वाय पाटील ग्रुपचे कार्यकारी संचालक डॉ. ए.के. गुप्ता उपस्थित होते.डॉ. गुप्ता म्हणाले गणित विषयाला व्यवहारात अनन्य साधारण महत्त्व आहे. गणित हा विषय अभियांत्रिकी शिक्षणासाठी अतिशय महत्त्वाचा आहे. विद्यार्थ्यांच्या गणित विषयाबद्दल न्यूनगंड कमी व्हावा व त्यांचा आत्मविश्वास वाढावा या हेतूने हि परीक्षा गेतली जाते.कॅम्पस संचालक डॉ. अभिजित माने म्हणाले, विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्याकरता सतेज मॅथ्स परीक्षेसारखा उपक्रम नक्कीच लाभदायी ठरतो. या परीक्षेसाठी कोल्हापूर जिल्ह्याच्या सर्वच तालुक्यातून सुमारे 2200 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.या परीक्षेमध्ये उमेश पोवार, साहिल मनगूतकर यांनी प्रथम क्रमांक, स्नेहल दळवी, यशराज पोवार यांनी द्वितीय तर दिगंबर पाटील व प्राजक्ता गुरव यांनी तृतीय क्रमांक मिळवला. त्यांना अनुक्रमे २५ हजार, १५ हजार व १० हजार रुपये अशी बक्षिसे देण्यात आली.यावेळी प्राचार्य डॉ. सुरेश डी.माने, प्रशासकीय अधिकारी सुयोग पाटील,सर्व विभाग प्रमुख आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन प्राध्यपिका सौ. वनश्री शिंदे यांनी केले.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!