
कोल्हापूर: शक्तीपीठ महामार्ग विरोधी समितीच्या वतीने हजारो शेतकऱ्यांसह कोल्हापुरात आज जिल्हाधिकारी कार्यालयावर महामोर्चा काढण्यात आला. या महामोर्चात खासदार श्रीमंत शाहू छत्रपती महाराज, आमदार सतेज पाटील साहेब, माजी खासदार राजू शेट्टी, माजी आमदार मालोजीराजे छत्रपती, संजयबाबा घाटगे, के.पी. पाटील, आमदार जयश्री जाधव वहिनी, आमदार राजू बाबा आवळे यांची प्रमुख उपस्थिती होती. कोल्हापूर क्षिण मतदारसंघातील सुखा समाधानाने जगणाऱ्या आणि शेतीवर अवलंबून असलेल्या अनेक शेतकऱ्यांना भूमिहीन करणारा हा महामार्ग रद्द झालाच पाहिजे, अशी आग्रही भूमिका यावेळी बोलताना मी मांडली.या महामोर्चास शिवसेनेचे संजय पवार, विजय देवणे, राष्ट्रवादीचे व्ही. बी. पाटील, आर. के. पोवार, डॉ. भारत पाटणकर, कॉ. अतुल दिघे, भगवान काटे, एम. पी. पाटील, मराठा महासंघाचे वसंतराव मुळीक, अमरीश घाटगे, राहुल आवाडे, रामराजे कुपेकर, गिरीश फोंडे, विक्रांत पाटील, सम्राट मोरे, शिवाजी कांबळे, बाबासो देवकर, धनराज घाटगे, महादेव धनवडे, प्रसाद खोबरे, सुधाकर पाटील, सर्जेराव देसाई, प्रकाश पाटील यांच्यासह कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकरी मोठ्या संख्येने सहकुटुंब उपस्थित होते.
Leave a Reply