
सध्या सर्वत्र चर्चेचा विषय बनलेला “बाई गं” या चित्रपटाची टिम कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिरात दर्शनासाठी आली होती. सर्व टिमने चित्रपटाच्या यशासाठी करवीरनिवासनी महालक्ष्मीचा आशीर्वाद घेतला.यावेळी अभिनेत्री सुकन्या मोने यांनी या चित्रपटात एक वेगळी कथा मांडली असून ती नक्कीच प्रेक्षकांना आवडेल असे सांगितले. यावेळी सुकन्या मोने यांच्यासह निर्माते डॉ. अशिष अग्रवाल, सागर कारंडे, नम्रता गायकवाड, नेहा खान व दिग्दर्शक पांडुरंग जाधव उपस्थित होते.बाई गं’ या चित्रपटात स्वप्नील जोशी मुख्य भूमिकेत आहेत. या चित्रपटाची कथा, पटकथा आणि संवाद पांडुरंग कृष्णा जाधव आणि विपुल देशमुख ह्यांनी केलं आहे. तर संकलन निलेश गावंड यांनी केले आहे. छायांकन नागराज एमडी दिवाकर यांनी केले आहे.नितीन वैद्य प्रोडक्शन, ए बी सी क्रिएशन आणि इंद्रधनुष्य मोशन पिक्चर्स प्रस्तुत ‘बाई गं’ हा चित्रपट १२ जुलै ला आपल्या जवळच्या सिनेमागृहात प्रदर्शित होत आहे.
Leave a Reply