वंचितांच्या उपेक्षितांच्या जीवनातील संघर्षात शिक्षण महत्वाचे: प्राचार्य महादेव नरके

 

कोल्हापूर:गोकुळ शिरगाव एमआयडीसी येथील युवा ग्रामीण विकास संस्था, गारगोटी संचलित आरोग्य प्रतिबंध विभाग,स्थलांतरित कामगार लक्ष गट हस्तक्षेप प्रकल्पाचे स्थलांतरित कामगारांच्यासाठी आरोग्य सेवेचे कार्य आदर्श आहे.त्याबरोबर वंचित,उपेक्षित, निराधार, मुलांच्या जीवनातील संघर्षात शिक्षण महत्वाचे असल्याचे प्रतिपादन प्राचार्य डॉ. महादेव नरके यांनी केले. जागतिक हिपॅटायटीस दिनांचे ओचीत्य साधून गोकुळ शिरगाव येथील एचआयव्ही/एड्स, गुप्तरोग, क्षयरोग, कावीळ जनजागृती कार्यक्रम अंतर्गत स्थलांतरित कामगारांच्या मुलांना शैक्षणिक साहित्य वाटप कार्यक्रम प्रसंगी बोलत होते.या कार्यक्रमास गोकुळ शिरगाव पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक दिगबर गायकवाड, पी. एस आय हणमंतराव बादोले, उजळाईवाडी महामार्ग पोलिस मदत केंद्राचे सपोनि सत्यराज घुले, गव्हर्मेंट कॉन्ट्रॅक्टर इंद्र्जित मोहिते, विशाल पोवार, मयूर रानडे, सामाजिक कार्यकर्ते अजित माने, किरण आडसुळ, सरपंच शुभांगी आडसुळ, रामा कांबळे, जीवन फाउंडेशनचे सतिश कांबळे, समुपदेशक प्रल्हाद कांबळे, प्रदीप आवळे, आनंद सज्जन, निखिल सुतार, संग्राम पुजारी, प्रतीक्षा जाधव, प्रियांका करगळे, दिपाली सातपुते, सुनील पाटील, अमोल हुदले, रवींद्र लोकरे यांच्यासह पिअर लीडर, कर्मचारी, पालक, उपस्थित होते.प्रास्ताविक व स्वागत प्रकल्प व्यवस्थापक मोहन सातपुते यांनी केले. आभार प्रल्हाद कांबळे यांनी मानले.

.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!