
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्या.,कोल्हापूर (गोकुळ) संघाशी संलग्न हातकणंगले तालुक्यातील प्राथमिक दूध संस्था संपर्क सभा आशीर्वाद मल्टीपर्पज हॉल, अतिग्रे ता.हातकणंगले येथे संघाचे माजी चेअरमन व ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व संचालक मंडळाच्या उपस्थितीत पार पडली.यावेळी बोलताना विश्वास पाटील म्हणाले हातकणंगले तालुक्याचा भौगीलिक विचार केला असता इतर तालुक्याच्या तुलनेत गोकुळला गाय दुधाचा पुरवठा जास्त आहे व म्हैस दुधाचा पुरवठा हा कमी आहे.त्यामुळे म्हैस दुधवाढ होण्यासाठी दूध उत्पादक, दूध संस्था यांनी एकत्रित प्रयत्न करावेत व संकलित झालेले सर्व दूध संघास पाठवावे तसेच आवश्यक त्या उपाय योजना करून व संघाच्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून म्हैस दूध वाढ कसे करता येईल यासाठी दूध संस्थांनी प्रयत्नशील रहावे असे आवाहन केले. अहवाल सालात वासरू संगोपन योजना, परराज्यातील जातिवंत म्हैस खरेदी, मिल्किंग मशीन यासह विविध योजनेच्या माध्यमातून गोकुळने हातकणंगले तालुक्यातील ९६ संस्थांच्या उत्पादकांना सुमारे ५१ लाख रुपयांचे अनुदान दिले असल्याचे विश्वास पाटील यांनी सांगितल.याप्रसंगी पुर परिस्थितीत दूध संकलन सुरळीत ठेवणारे व उत्कृष्ट कामगिरी केलेल्या संघाच्या विस्तार सुपरवाझर यांचा सत्कार करण्यात आला. किसान विमा पॉलिसी अंतर्गत अपघाती मृत पावलेल्या सभासदांच्या वारसांना व मृत्यूमुखी पडलेल्या जनावरांच्या मालकांना विमा रक्कमेचे धनादेश वाटप करण्यात आले. संकलन, पशुसंवर्धन, वैरण विकास, पशुखाद्य, वित्त, मिल्कोटेस्टर, संगणक, गुणनियंञण या विभागावर सविस्तर चर्चा होवून अडचणी समजावून घेवून त्या प्रश्नांचे निरसन करण्यात आले तसेच विविध सूचनाची नोंद घेण्यात आली. यावेळी संचालक बाबासाहेब चौगले, अभिजित तायशेटे, अजित नरके, शशिकांत पाटील –चुयेकर, किसन चौगले, नंदकुमार ढेंगे, कर्णसिंह गायकवाड, संभाजी पाटील, प्रकाश पाटील, अमरसिंह पाटील, सुजित मिणचेकर, बयाजी शेळके, बाळासाहेब खाडे, चेतन नरके, राजेंद्र मोरे, मुरलीधर जाधव, कार्यकारी संचालक योगेश गोडबोले व संघाचे अधिकारी, दुध संस्था कर्मचारी संघटना प्रतिनिधी तसेच हातकणंगले तालुक्यातील दूध संस्थाचे प्रतिनिधी,दूध उत्पादक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
Leave a Reply