गाय दुधाप्रमाणे म्हैस दुधास अनुदान मिळावे : चेअरमन अरुण डोंगळे

 

कोल्हापूर: महाराष्ट्र शासनाकडून ठराविक काळासाठी गाय दुधाला प्रति लिटर पाच रुपये अनुदान देण्याची घोषणा केली आहे याउलट कर्नाटक, गोवा, मध्यप्रदेश, राजस्थान आणि तेलंगणा या राज्यात गाय दुधाबरोबर च म्हैस दुधासाठी ही अनुदान दिले जाते त्याप्रमाणे महाराष्ट्र सरकारने सहकारी दूध संघांच्या माध्यमातून संकलित होणाऱ्या गाय दुधाबरोबरच म्हैस दुधालाही अनुदान देऊन प्रोत्साहन देण्याची गरज आहे अशी मागणी निवेदनाद्वारे गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे यांनी आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचेकडे केली. महाराष्ट्र आणि विशेषता कोल्हापूर जिल्ह्यातील म्हैस दूध हे चांगले, सकस, पोषक आणि दर्जेदार असून पुणे, मुंबई सारख्या शहरांमध्ये या म्हैस दुधाला जास्त मागणी आहे मात्र अपेक्षित दराअभावी राज्यासह कोल्हापूर जिल्ह्यातील दूध उत्पादक मेटाकुटीला आल्याचे दिसत आहे यावर उपाय म्हणून महाराष्ट्र शासनामार्फत राज्यातील गाय दूध खरेदीसाठी सध्या प्रतिलिटर पाच रुपये अनुदान देण्यात येत आहे परंतु फक्त गाय दुधालाच अनुदान जाहीर केल्यामुळे दूध उत्पादक शेतकरी गाय पालनाकडे आकर्षित होत असल्याचे दिसून येते परिणामी म्हैस दूध उत्पादन कमी होण्याची शक्यता आहे तसेच म्हैस दूध उत्पादकामध्ये आपल्यावर अन्याय झाल्याची भावना आहे. सहकारी दूध संघांच्या माध्यमातून संकलित होणाऱ्या दुधाला अनुदान दिल्यास सहकारी संस्थांना बळकटी देण्याबरोबरच म्हैस दूध उत्पादकांना दिलासा मिळेल तरी याबाबत शासन स्तरावर सकारात सकारात्मक निर्णय व्हावा अशी मागणी डोंगळे यांनी निवेदनाद्वारे राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे केली आहे यावर अजितदादा पवार यांनी मंत्रिमंडळात चर्चा करून सकारात्मक निर्णय घेतला जाईल असे यावेळी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!