हरित कोल्हापूरसाठी युवकांची भूमिका महत्वाची : आ.ऋतुराज पाटील

 

कोल्हापूर: निसर्ग समृद्ध असलेले कोल्हापूर पर्यावरणाच्या दृष्टीने अधिक समृद्ध करण्यासाठी कोल्हापूरकरांनी आज पुढचे पाऊल टाकले आहे.‘माय ट्री, माय कोल्हापूर’ उपक्रमांतर्गत वृक्षप्रेमी व्यक्ती आणि नागरिकांच्या साथीने एकाच दिवशी एकाच ठिकाणी २ हजार झाडे लावण्याचा रेकॉर्ड ब्रेक ‘ऋतूसंकल्प’ आज यशस्वी झाला याचा मनस्वी आनंद होत आहे. या झाडांची निगा राखण्याबरोबरच आपल्या भावी पिढीपर्यंत ‘झाडे लावा आणि झाडे जगवा’चा संदेश या माध्यमातून उपस्थितांनी द्यावा.. हरित कोल्हापूरचे स्वप्न साकार करावे, असे आवाहन आमदार ऋतुराज संजय पाटील यांनी केले.आमदार ऋतुराज पाटील यांच्या संकल्पनेतून रविवारी राजाराम तलाव परिसरात एकाच वेळी २ हजार झाडे लावण्यात आली. या उपक्रमाच्या शुभारंभ प्रसंगी आमदार पाटील बोलत होते.या झाडांची कायमस्वरूपी निगा राखण्याची जबाबदारी आपण घेतली आहे. उजळाईवाडी ग्रामपंचायतीचे यासाठी चांगले सहकार्य लाभले असून त्यांनी पाण्यासाठी टँकर उपलब्ध करून दिले आहेत.या रेकॉर्ड ब्रेक उपक्रमास तरुणाईचा प्रचंड प्रतिसाद लाभला. यामध्ये विविध असोसिएशनचे पदाधिकारी विविध वृक्ष प्रेमी संघटना, ज्येष्ठ नागरिक, महिला भगिनी, लहान मुले उपस्थित कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. महादेव नरके यांनी केले.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!