गोकुळच्या वार्षिक सभेत विरोधकांचा गोंधळ ; पण सर्व विषय मंजूर

 

कोल्‍हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ) ची ६२ वी वार्षिक सर्वसाधारण सभा महालक्ष्मी पशुखाद्य कारखाना पंचतारांकित औद्योगिक वसाहत, कागल येथील आवारात खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. विरोधकांनी गोंधळ करत विषय नामंजूर च्या घोषणा दिल्या. तसे फलकही अध्यक्षांना दाखवण्यात आले. परंतु मंजूर म्हणणाऱ्यांची संख्या जास्त असल्यामुळे सर्व विषय सभेत मंजूर करण्यात आले. सभेचे स्वागत व प्रास्ताविक संघाचे चेअरमन अरुण डोंगळे यांनी केले, सभेचे नोटीस वाचन व अहवालातील विषय वाचन कार्यकारी संचालक योगेश गोडबोले यांनी केले. तर प्राथमिक दूध संस्था मार्फत लेखी आलेल्या सर्व प्रश्नाचे समर्पक उत्तरे चेअरमन अरुण डोंगळे यांनी दिली व आभार संचालक शशिकांत पाटील–चुयेकर यांनी मानले.या वार्षिक सर्वसाधारण सभेवेळी संघाच्‍या दूध उत्‍पादक यांना संघाच्‍या विविध योजनाची माहिती होण्‍यासाठी वैरण विकास विभाग, दूध संकलन विभाग, महिला नेतृत्‍व विकास, मिल्‍को टेस्‍टर विभाग, मार्केटिंग विभाग, पशुसंवर्धन विभाग, मिल्क कुलर विभाग, सेंद्रिय खते विभाग, इत्‍यादी विभागानचे स्‍टॅाल संघाच्‍या वतीने लावण्‍यात आले होते. त्‍याचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री मान. नामदार हसन मुश्रीफसो, माजी गृहराज्यमंत्री महाराष्ट्र राज्य आमदार सतेज पाटीलसो यांच्‍या हस्‍ते व संघाचे चेअरमन,सर्व संचालक मंडळाच्या उपस्थित करण्यात आले. तसेच संघास दिल्ली येथील इंडियन डेअरी असोसिएशन (पश्चिम विभाग) या दुग्ध व्यवसायातील शिखर संस्थेमार्फत महाराष्ट्रातील ‘अतिउत्कृष्ट दुग्ध प्रकल्प’ (बेस्ट डेअरी प्लांट) हा मानाचा पुरस्कार मिळाल्याबद्दल गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे यांचा सत्कार जिल्ह्यातील दूध संस्थाच्या वतीने सत्कार करण्यात आला. तसेच गोकुळशी संलग्न असलेल्या मनाली सहकारी दूध संस्था, पेद्रेवाडी (आजरा) या संस्थेच्या महिला दूध उत्पादक सौ.लता उत्तम रेडेकर यांना ‘बेस्ट वुमेन फार्मर’ हा पुरस्कार मिळालेबद्दल गोकुळच्या वतीने सत्कार करण्यात आला.सभेमध्ये सन २०२३-२४ या आर्थिक वर्षाचा अहवाल, ताळेबंद, नफा-तोटा, व्यापारी पत्रक,आर्थिक वर्षाच्या नफा विभागणीस, अंदाजपत्रकापेक्षा जादा झालेल्या खर्चास व अंदाज पत्रकास, लेखा परीक्षण अहवाल दोष दुरूस्ती करून खात्यास पाठविनेस तसेच सन २०२४-२५ साठी वैधानिक लेखापरीक्षकांची नियुक्ती करणेस, बोरवडे शितकरण केंद्र व सॅटेलाईट डेअरी उदगांव लगतची जागा खरेदी करणेस, संघाच्या पोटनियमामध्ये आवश्यक ते बदल करणेस, पशुवैद्यकीय व डेअरी टेक्नॉलॉजी महाविद्यालय स्थापन करणे या सर्व विषयास सभासदांनी बहुमतांनी मंजूरी दिली.

कोल्हापूर जिल्ह्यातील आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होणाऱ्या खेळाडूंना व ग्रामिण भागातील कुस्ती मैदानांना आर्थिक मदत देणे, संघाच्या स्वः मालकीच्या असणाऱ्या सर्व जागा विकसीत करणे, भेसळयुक्त दुध पुरवठा करणाऱ्या संस्थांवर कारवाई करणे व दूध उत्पादक भविष्य कल्याण योजना पुर्ववत सुरु करणेबाबत या सर्व आयत्यावेळी आलेल्या विषयांना ही सभासदांनी बहुमतांनी मंजूरी दिली.
यावेळी वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री मान. नामदार हसन मुश्रीफसो, माजी गृहराज्यमंत्री महाराष्ट्र राज्य आमदार सतेज पाटील, ज्येष्‍ठ संचालक विश्वास पाटील, संचालक बाबासाहेब चौगले, अभिजित तायशेटे, अजित नरके, नविद मुश्रीफ, शशिकांत पाटील–चुयेकर, किसन चौगले, रणजितसिंह पाटील, नंदकुमार ढेंगे, कर्णसिंह गायकवाड, संभाजी पाटील, प्रकाश पाटील, सुजित मिणचेकर, अमरसिंह पाटील, बयाजी शेळके,अंबरिषसिंह घाटगे, बाळासो खाडे, युवराज पाटील, राजेंद्र मोरे, मुरलीधर जाधव, संचालिका श्रीमती अंजना रेडेकर, कार्यकारी संचालक योगेश गोडबोले, के.डी.डी.सी बँक संचालक प्रताप उर्फ भैय्या माने, संचालिका स्मिता गवळी, शिरोळचे माजी आमदार उल्लास पाटील, गोपाळ पाटील, रामराजे कुपेकर, सत्यजित जाधव तसेच विविध क्षेत्रातील पदाधिकारी, दूध संस्थांचे प्रातिनिधी व महिला प्रतिनिधी, संघाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!