रामानंदगर चौकात ट्रॅफिक सुरळीत करण्यासाठी रस्त्यावर उतरले आमदार सतेज पाटील

 

कोल्हापूर:गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूरात रस्त्यावर लोकांची प्रचंड गर्दी झाली आहे.साने गुरुजी वसाहत परिसरात माजी स्थायी समिती सभापती शारंगधर देशमुख यांच्या वाढदिवस कार्यक्रमासाठी रात्री साडेसात वाजता जाताना आमदार सतेज पाटील हे रामानंदनगर चौकातील गर्दी पाहून स्वतः गाडीतून खाली उतरले.आणि त्यांनी ट्रॅफिक सुरळीत करण्यास सुरुवात केली .काही वेळातच त्यांचे कार्यकर्ते दुर्वास कदम( बापू ),मॉन्टी मगदूम आणि सतीश जाधव ( एस.के.) हे सुद्धा त्या ठिकाणी आले आणि त्यांनी सुद्धा यामध्ये सहभाग घेतला.थोड्या वेळाने पाच ते सहा पोलीस सुद्धा या ठिकाणी येऊन तेसुद्धा कार्यरत झाले.आमदार सतेज पाटील यांनी दाखवलेली ही तत्परता लोकांना भावली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!