
कोल्हापूर /प्रतिनिधी : शहरातील ८१ प्रभागापैकी ५० प्रभागांमध्ये उत्तर व दक्षिण मतदार संघ मिळून २५ कोटी रुपयांचा निधी विविध विकास कामांकरिता उपलब्ध करण्यात आलेला आहे. भीमा स्विमिंग पूल करता अडीच कोटीचा निधी उपलब्ध करण्यात आलेला आहे. लवकरच ते स्पोर्ट्स अकॅडमी उभा करण्यात येणार आहे. कचरा व्यवस्थापनासाठी अजून निधी उपलब्ध करण्याची आवश्यकता आहे.तरच शहर कचरामुक्त होईल. विकास कामांमध्ये रस्ते डांबरीकरण, काँक्रिटीकरण, गटर्स, हायमास्ट दिवे यांचा समावेश आहे. तसेच पहिल्या टप्प्यात १ ऑक्टोबर पासून विकास कामांना गती देणार असून आचारसंहिता लागण्यापूर्वी ही कामे पूर्ण व्हावीत याकडे लक्ष देणार असल्याचे कृष्णराज महाडिक यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. खासदार धनंजय महाडिक यांना स्थानिक पातळीवर फार लक्ष घालता येत नसल्यामुळे ही धुरा मी सांभाळली आहे. शहरातील प्रत्येक प्रभागात प्रलंबित विकास कामे करण्यात येणार आहेत. संधी मिळाली तरच विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचे देखील त्यांनी यावेळी स्पष्ट केले. यावेळी आजी आणि माजी नगरसेवक उपस्थित होते.
Leave a Reply