आधी चर्चा करायला हवी होती ; पक्ष सोडून जाणे हे अशोभनीय : आमदार सतेज पाटील

 

कोल्हापूर / प्रतिनिधी : कोल्हापूर उत्तरच्या विद्यमान आमदार जयश्री जाधव यांनी नुकताच शिवसेनेच्या शिंदे गटात प्रवेश केला. पक्ष बदलण्याआधी आमदार जाधव यांनी आमच्याशी चर्चा करणे आवश्यक होते. तसेच पाच वर्षांपूर्वी चंद्रकांत अण्णा जाधव हे भाजपचे होते. तरी देखील त्यांना काँग्रेसमधून उमेदवारी देण्यात आली. आणि ते निवडून आले. त्यानंतर दुर्दैवाने पुन्हा अडीच वर्षांनी पोटनिवडणूक लागली. या निवडणुकीत देखील त्यांच्या पत्नी जयश्री जाधव यांना उमेदवारी देऊन सर्व कार्यकर्त्यांनी त्यांना निवडून आणण्यासाठी जीवाचे रान केले होते. आपली बहीण निवडणुकीला उभारलेली आहे असे मानून कार्यकर्त्यांनी त्यांना निवडून आणले. परंतु आत्ताच्या या विधानसभेच्या निवडणुकीत केवळ विचारले नाही म्हणून पक्ष सोडण्याचे कारण नव्हते. त्याआधी आमच्याशी चर्चा करायला हवी होती, अशी अपेक्षा बंटी उर्फ सतेज पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली. त्यांच्यावर कोणता दबाव आहे हे आम्हाला माहिती नाही. काँग्रेस पक्ष असे अनेक धक्के नेहमीच सहन करत असतो. परंतु जनता सुज्ञ आहे. महायुतीत गेल्यामुळे त्यांचा करेक्ट कार्यक्रम होईल, असे देखील बंटी पाटील यांनी सांगितले.राजेश लाटकर यांना उमेदवारी मिळाली नाही. तरीदेखील ते नाराज न होता आमच्याबरोबरच आहेत असे देखील सतेज पाटील यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!