
कोल्हापूर: शिरोळ विधानसभा मतदारसंघातील इंडिया आघाडी आणि महाविकास आघाडीचे उमेदवार गणपतराव पाटील यांच्या प्रचाराचा शुभारंभ आदरणीय खासदार शाहू छत्रपती महाराज, खासदार सुप्रियाताई सुळे आणि आ.सतेज पाटील यांच्या उपस्थितीत श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथील श्री दत्त महाराजांचे दर्शन घेऊन करण्यात आला.या प्रसंगी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे वंशज भूषणसिंह होळकर जी, माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे, माजी आमदार राजीव आवळे, राष्ट्रवादीचे व्हि. बी. पाटील, रावसाहेब भिलवडे, शिवसेनेचे संजय पवार, चंगेज खान पठाण, वैभव उगळे, श्री दत्त सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन रघुनाथ पाटील, संचालक अनिलराव यादव यांच्यासह पृथ्वीराजसिंह यादव, ए. बी. पाटील, मधुकर पाटील, संजय अनुसे, धनाजीराव जगदाळे, विजय पाटील, माधुरी सावगावे, स्वाती सासणे, भवानी घोरपडे, आजी- माजी नगरसेवक तसेच कारखान्याचे अन्य संचालक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Leave a Reply