
कोल्हापूर: इसुझुची दर्जात्मक सेवा व मालकीहक्क अनुभव देण्याप्रती असलेली कटिबद्धता कायम राखण्याच्या सातत्यपूर्ण प्रयत्नासह इसुझु मोटर्स इंडिया इसुझु डी-मॅक्स पिक-अप्स आणि एसयूव्हींच्या श्रेणीसाठी देशव्यापी ‘इसुझु आय-केअर विंटर कॅम्प’ राबवणार आहे. या सर्विस कॅम्पचा देशभरातील ग्राहकांना यंदाच्या हंगामादरम्यान त्रासमुक्त ड्रायव्हिंगच्या अनुभवासाठी उत्साहवर्धक लाभ आणि प्रतिबंधात्मक देखभाल तपासणी सुविधा देण्याचा उद्देश आहे.’इसुझु केअर’चा उपक्रम विंटर कॅम्प ०९ ते १४ डिसेंबर २०२४ दरम्यान सर्व इसुझु ऑथोराइज्ड डिलर सर्विस आऊटलेटमध्ये कॅम्प राबवण्यात येईल. या कालावधीदरम्यान ग्राहक त्यांच्या वाहनांसाठी स्पेशल ऑफर्स व लाभांचा देखील आनंद घेऊ शकतात.सदर विंटर कॅम्प अहमदाबाद, बारामुल्ला, बेंगळुरू, भांडुप(मुंबई), कालिकत, भुज, चेन्नई, कोईम्बतूर, दिमापूर, दुर्गापूर , गांधीधाम, गोरखपूर, गुरुग्राम, गुवाहाटी, हिस्सार, हुबळी, हैदराबाद, इंदौर, इटानगर,जयपूर, जयगाव, जम्मू जालंधर, जोधपूर, कर्नाल, कोची, कोल्हापूर, कोलकाता, कुर्नूल, लखनौ, एलबी नगर(हैदराबाद),लेह, मदुराई, मंडी, मंगलोर, मेहसाणा, मोहाली, मुंबई, मैसूर, नागपूर, नाशिक, नवी दिल्ली ,नोएडा, नेल्लोर, पटणा, पुणे, रायपूर, रत्नागिरी, राजमुंद्री, राजकोट, सातारा, शिवमोगा, सिलीगुडी, सुरत, तिरूनवेल्ली, तिरुपती, त्रिची,त्रिवेंद्रम, वडोदरा, विजयवाडा आणि विशाखापट्टणम येथील इसुझुच्या सर्व अधिकृत सर्विस केंद्रांमध्ये राबवण्यात येईल. येथे असलेल्या इसुझूच्या सर्व अधिकृत सेवा सुविधांमध्ये विंटर कॅम्पचे आयोजन केले जाईल.ग्राहक सर्विस बुकिंगसाठी जवळच्या इसुझु डिलर आऊटलेलशी संपर्क साधू शकतात किंवा https://www.isuzu.in/servicebooking.html या वेबसाइटला भेट देऊ शकतात. तसेच अधिक माहितीसाठी ग्राहक १८०० ४१९९ १८८ (टोल-फ्री) या क्रमांकावर संपर्क साधू शकतात.
Leave a Reply