
कोल्हापूर/प्रतिनिधी : शेतकऱ्यांना एकाच छताखाली नवनवीन शेतीविषयक तंत्रज्ञानाची माहिती मिळावी या उद्देशाने डी. वाय. पाटील ग्रुप, महाराष्ट्र शासन कृषी विभाग, आत्मा कोल्हापूर, कृषी विज्ञान केंद्र यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित पश्चिम महाराष्ट्रातील भव्य अशा “सतेज कृषी प्रदर्शन २०२४” प्रदर्शनास शेतकऱ्यांनी आज दुसऱ्या दिवशी शनिवारी तपोवन मैदानावर गर्दी केली होती. यावर्षीचे प्रदर्शनाचे सहावे वर्ष असून अडीचशे हून अधिक स्टॉल, २०० पेक्षा अधिक कृषी कंपन्यांचा सहभाग,अन्य पशुपक्षी विविध, शेतीला लागणारी विविध अवजारे, बी बियाणे, खते, आयुर्वेदिक औषधे यांचा समावेश आहे. प्रदर्शनात शेतकऱ्यानी पिकविलेला विविध प्रकारचा तांदूळ, विदेशी भाजीपाला, कोल्हापूर जिल्ह्यात पिकविण्यात आलेला भाजीपाला,विदेशी भाजीपाला,फुले,जिल्ह्यातील विविध तालुक्यातील कृषी विभागाने तयार केलेली शेतीविषयक डेमो,शेततळे आदींचा समावेश असून हे प्रदर्शन पाहण्यासाठी व शेती साहित्य खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांनी तपोवन मैदानावर मोठी गर्दी केली आहे.प्रदर्शनात दुसऱ्या दिवशी एकूण दोन कोटीच्या आसपास उलाढाल ही झाली आहे.प्रदर्शनात मातोश्री फार्म हाऊस गिरगाव फाटा येथील जितेंद्र पाटील यांचा चारदाती १२६० किलो वजनाचा मुऱ्हा जातीचा बाहुबली हा नामवंत रेडा या प्रदर्शनाचे खास आकर्षण ठरत आहे. त्यापासून झालेल्या अपत्याचे वजन हे ६० किलोच्या पुढे आहे तर म्हैशीचे दूध २२ लिटर इतके आहे.बाहुबली रेडा दिवसाला दहा लिटर दूध पितो, तीन किलो हरभरा डाळ खातो,पावशेर तूप,५ अंडी, चंदी आणि मुरघास खातो त्याची वैशिष्ट्ये म्हणजे त्याची उंची ५.६ इंच आहे लांबी ८.८ इंच आहे.कागल येथील हैदर भाई फार्म अमेरीकन १८ इंचाचे बोकड, वर्षाला ३०० अंडी देणारी ब्लॅक ऑस्ट्रेलियन कोंबडी प्रदर्शनाचे ठरत आहे.याचबरोबर गडहिंग्लज येथील हसुरचंपू गावातील स्वप्निल पवार यांचा तेराशे १३६० किलो वजनाचा युवराज रेडा जो ३८ महिन्याचा आहे तोही आकर्षण ठरत आहे.याचबरोबर विदेशी भाजीपाला जुकेनिया काकडी,कागल येथील फुटबॉल आकाराचा पपई,नागदेववाडीतील २५ किलो वजनाचा केळी घड, सात किलोचा भोपळा,लांब पपई आणि पाच किलो वजनाचा भला मोठा कोबी, चिंचवाड शिरोळ येथील नागेंद्र घाटगे यांचा लाल कोबी,नांदणी शिरोळ येथील गेट्स फुल राशिवडे येथील जरबेरा फुले निशिगंध,बेले येथील ९७८ वान असलेला दोडका प्रदर्शनाचे आकर्षण ठरले.विदेशी भाजीपाला व स्थानिक भाजीपाला, चेरी टोमॅटो सुळकुड येथील एक किलोचे भरताचे वांगे बारवेक काळी वांगी, कलर कॅप्सिकम रंगीत ढबु मिरची . याचबरोबर विविध कँपन्यांची उत्पादने विविध प्रकारची ट्रॅकटर्स मांडण्यात आली आहेत.या प्रदर्शनामध्ये देशातील आघाडीच्या व विदेशी संलग्नीकरण असलेल्या विविध कृषी क्षेत्रातील संस्था सहभागी झाल्या असून यामध्ये गोकुळ दूध संघ व त्यांची उत्पादने,ओंकार बंब, पाटील ऑईल मशीन, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, गोकुळ दूध संघ,या प्रदर्शनामध्ये देशातील आघाडीच्या व विदेशी संलग्नीकरण असलेल्या विविध कृषी क्षेत्रातील संस्था सहभागी झाल्या आहेत. शेतीची अवजारे, खते औषधे,आदी कंपन्या सहभागी झाल्या आहेत.या कंपन्याची उत्पादने पाहावयास मिळत आहेत.व शेतकरी या साहित्यांची खरेदी करत आहेत. शिवाय शेतीची नवीन माहिती व अन्य नवनवीन औजारे पहावयास मिळत आहेत.खरेदी केली जात आहे.व खाद्य महोत्सव अंतर्गत विविध खाद्य पदार्थांवर शेतकरी व नागरिक ताव मारत आहेत.प्रदर्शनामध्ये शेतकरी ते ग्राहक असा थेट विक्री होणारा तांदूळ महोत्सव, धान्य महोत्सव भरविण्यात आला असून तांदळाची विक्री मोठ्या प्रमाणात होत आहे. यामध्ये आजरा घनसाळ, रत्नागिरी २४, भोगावती, इंद्रायणी,हात सडीचा अशा नमुन्यांचा तांदूळ उपलब्ध करण्यात आला आहे.ज्याची विक्री ही होत आहे.शिवाय राधानगरी येथील घरगुती हळद,व अन्य शेतकरी यांची हळद,मसाले,सेंद्रिय गूळ नाचणी,उडीद,विविध फळे पेरू,मसाले,विविध साहित्य विक्रीसाठी ठेवण्यात आले आहेत. त्यांची खरेदी होत आहे.स्थानिक भाज्यासह विदेशी भाजीपाला पहावयास मिळत आहे.भाज्यांमध्ये सरबत फळ, कसबा नूल येथील राजगोंडा हबीगोंडे यांची एक फुटाची लाल मिरची युवराज कुंभार कुंभारवाडी राधानगरी यांचा यांचे बनकर फळ लाल कोबी बंडोपंत संकपाळ राहणार धनुरे कागल यांची बाजरी पांडुरंग गुरव यांचा लाल भोपळा लाल भोपळा,हळद, आदींसह विदेशी भाजीपालामध्ये सियसन आरकरली, बेसिस,तर फुलांमध्ये राधानगरी येथील संजय ता यांचा जरबेरा,भडगाव येथील निशिंगध,जिप्सी फिलिया,औरचिड अशा फुलांचा समावेश आहे.
Leave a Reply