सतेज कृषी प्रदर्शनाच्या तिसऱ्या दिवशी तुफान तुडुंब गर्दी; तीन दिवसात ५ कोटीच्या उलाढाल

 

कोल्हापूर/प्रतिनिधी: तपोवन मैदान येथे आयोजित सतेज कृषी व पशुपक्षी प्रदर्शनाला आज तिसऱ्या दिवशी तरुण शेतकरी शालेय विद्यार्थी, शेतकऱ्यांनी व महाविद्यालयीन विद्यार्थी यांनी तुडुंब गर्दी केली होती.तीन दिवसात उच्चांकी तांदळाची विक्री झाली आहे. महिलांनी खाद्य पदार्थ स्टॉलच्या माध्यमातून तीन दिवसात २५ लाखांची उलाढाल ही झाली आहे. शेतीसाठी लागणारी मोठी यंत्रे,व अवजारे यांची याठिकाणी नोंदणी ही शेतकऱ्यांनी केली आहे. तीन दिवसात ५ कोटींच्या आसपास उलाढाल झाली आहे.आजरा घनसाळ आणि आजरा इंद्रायणी तांदळाची उच्चांकी विक्री झाली असून मागणी वाढत चालली आहे. आज प्रदर्शनाचा शेवटचा दिवस असल्याने आणखी शेतकऱ्यांच्या तांदळाची विक्री होणार आहे.तरी प्रदर्शनाच्या शेवटच्या दिवशी शेतकऱ्यांनी भेट देण्याचे आवाहन आमदार सतेज पाटील यांनी केले आहे. प्रदर्शनाच्या आजच्या तिसऱ्या दिवशी रविवार सुट्टी होती त्यामुळे लोकांनी कोल्हापूर सह,सांगली,सातारा, सोलापूर, कर्नाटक,इचलकरंजी,बेळगाव व कोल्हापूर जिल्ह्यातील आसपासच्या ग्रामीण भागातील शेतकऱ्यांनी तुफान, तुडुंब गर्दी कृषी प्रदर्शन पाहण्यासाठी व शेती उपयुक्त साहित्य खरेदीसाठी तपोवन मैदानावर केली.

,नागदेववाडीतील २५ किलो वजनाचा केळी घड, सात किलोचा भोपळा,लांब पपई आणि पाच किलो वजनाचा भला मोठा कोबी, चिंचवाड शिरोळ येथील नागेंद्र घाटगे यांचा लाल कोबी,नांदणी शिरोळ येथील गेट्स फुल राशिवडे येथील जरबेरा फुले निशिगंध,बेले येथील ९७८ वान असलेला दोडका प्रदर्शनाचे ठरत आहेत.विदेशी भाजीपाला व स्थानिक भाजीपाला, चेरी टोमॅटो सुळकुड येथील एक किलोचे भरताचे वांगे बारवेक काळी वांगी,गडहिंग्लज येथील आनंदा कानडे यांची कलर कॅप्सिकम रंगीत ढबु मिरची खास आकर्षण आहेत हे सर्व पाहण्यासाठी तपोवन मैदानावर तुफान गर्दी होत आहे.
याचबरोबर फुलांचे प्रदर्शन व विक्री (पुष्पप्रदर्शन) बचत गटांचे मोफत स्टॉल, लहान मुलांसाठी अम्युझमेंट पार्क आदींचा समावेश असल्याने याठिकाणी गर्दी ही लहान मुलांसह आबालवृद्ध आणि शेतकरी करत आहेत.प्रदर्शनामध्ये खाद्य महोत्सव भरविण्यात आला असून याठिकाणी कोल्हापूरकर आस्वाद घेत आहेत. तसेच शासनाच्या विविध योजनांची माहिती या ठिकाणी दिली जात आहे.तर पाणलोट व्यवस्थापन, पाचट व्यवस्थापन,ठिबक सिंचन, गांडूळ खत युनिट,औषध फवारणी याची माहिती दिली जात आहे.गावरान कुकुट पालन कसे करावे, शेतकरी ते ग्राहक असा थेट विक्री होणारा तांदूळ महोत्सव, धान्य महोत्सव भरविण्यात आला असून तांदळाची विक्री मोठ्या प्रमाणात होत आहे. यामध्ये आजरा घनसाळ, रत्नागिरी २४, भोगावती, इंद्रायणी,हात सडीचा अशा नमुन्यांचा तांदूळ उपलब्ध करण्यात आला आहे.ज्याची विक्री ही प्रचंड होत आहे.शिवाय राधानगरी येथील घरगुती हळद,व अन्य शेतकरी यांची हळद,मसाले,सेंद्रिय गूळ नाचणी,उडीद, विविध फळे पेरू,मध, जाम,काजू,बदाम,विविध साहित्य विक्रीसाठी ठेवण्यात आले आहेत. त्यांची खरेदी होत आहे.बदक,पांढरे उंदीर राजहंस,लवबर्ड,पोपट आदी जनावरे प्रदर्शनात आली आहेत जे प्रदर्शनाचे खास आकर्षण ठरत आहेत.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!