
कोल्हापूर : आ.सतेज पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ‘गोकुळ’चे शिल्पकार स्वर्गीय आनंदराव पाटील- चुयेकर यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने कोल्हापूर लोकसभेचे खासदार आदरणीय शाहू छत्रपती महाराज, महाराष्ट्राचे नूतन वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री ना. हसन मुश्रीफ आणि सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री ना. प्रकाश आबिटकर यांचा जिल्हा दूध उत्पादक संघाच्या वतीने जाहीर सत्कार करण्यात आला.यावेळी संबोधित करताना ‘गोकुळ’ हा ‘महाराष्ट्राचा ब्रँड’ व्हावा हे स्वर्गीय आनंदराव पाटील- चुयेकरांचे स्वप्न साकार करण्यासाठी त्यांच्या विचारांचा वसा आणि वारसा आपल्या सर्वांना चालवायचा आहे असे आवाहन केले. तसेच गोकुळच्या माध्यमातून प्रत्येक दूध उत्पादक शेतकऱ्याला न्याय देऊन आपण सर्वजण मिळून जिल्ह्याला विकासात्मक दृष्टीकोनातून पुढे घेऊन जाऊ असा विश्वास व्यक्त केला.
यावेळी गोकुळचे अध्यक्ष अरूणकुमार डोंगळे, माजी अध्यक्ष आणि विद्यमान संचालक विश्वास पाटील (आबाजी), बाबासाहेब चौगले, माजी आमदार सुजित मिणचेकर, शशिकांत आनंदराव पाटील- चुयेकर आणि चुयेकर कुटुंबिय़ यांच्यासह संचालक बाळासाहेब खाडे, अभिजीत तायशेटे, अजित नरके, नाविद मुश्रीफ, कर्णसिंह गायकवाड, अंबरीश घाटगे, डॉ. चेतन नरके, युवराज पाटील, संभाजी पाटील, किसन चौगले, नंदकुमार ढेंगे, प्रकाश पाटील, अमरसिंह पाटील, बयाजी शेळके, श्रीमती अंजना रेडेकर, मुरलीधर जाधव, राजेंद्र मोरे, कार्यकारी संचालक योगेश गोडबोले यांच्यासह संघाच्या सर्व विभागाचे अधिकारी, दूध संस्थांचे प्रतिनिधी तसेच दूध उत्पादक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Leave a Reply