
कोल्हापूर/प्रतिनिधी : जनरल प्रॅक्टिस करणाऱ्या डॉक्टरांनी आपले शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य चांगले ठेऊन चांगले कार्य करा असा मोलाचा सल्ला प्रसिध्द हृदय शस्त्रक्रिया तज्ञ डॉ. एम.डी. दिक्षीत यांनी दिला. जनरल प्रॅक्टिशनर्स असोसिएशन कोल्हापूर व डॉ. विवेकानंद कुलकर्णी यांचे अंतरंग गॅस्ट्रोइंटरॉलॉजी (पोटविकार) सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने १२ वी “जीपीकॉन २०२५-गॅस्ट्रोकॉन” ही वैद्यकीय परिषद आज हॉटेल अयोध्या येथे संपन्न झाली.या परिषदेचे उद्घाटन प्रसिध्द हृदय शस्त्रक्रिया तज्ञ डॉ. एम.डी. दिक्षीत यांच्या हस्ते झाले.यावेळी दीक्षित बोलत होते.आयुष्य एकदाच मिळते.त्यामुळे त्याचा उपयोग चांगला करा.तुम्ही सर्वजण चांगले काम करत आहात.हे जनरल प्रॅक्टिस डॉक्टर.सर्वासाठी उपयुक्त असतात.२४ तास पैकी एक तास तुम्ही स्वतःला मी स्वतः रोज योगा आणि १० किलोमिटर जॉगिंग करतो आपणही आपले आरोग्य सुरळीत ठेऊन रुग्णसेवा करा असा सल्लाही दीक्षित यांनी यावेळी दिला.यावेळी गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी या जनरल प्रॅक्टिशनर्स असोसिएशन तर्फे करत असलेल्या कामास शुभेच्छा दिल्या.यावेळी बोलताना त्यांनी स्वास्थ्य रक्षणार्थ क्लिनिक जनरल डॉक्टरांनी उभे करावेत यासाठी सर्वांनी एकत्र येऊन काम करावे असे सांगितले.येथील जनरल प्रॅक्टिशनर्स असोसिएशन कोल्हापूर ही कोल्हापूर शहर व जिल्ह्यातील फॅमिली डॉक्टरांची अग्रणी संघटना गेली २३ वर्षे कार्यरत आहे. एक दिवसीय झालेल्या या वैद्यकीय परिषदेत पोटविकार तज्ञाकडून डॉ.विवेकानंद कुलकर्णी, डॉ.अदित्य कुलकर्णी, डॉ.दिनेश एक्झमबरम, डॉ.तेजस कुलकर्णी, डॉ. मनीषा कुलकर्णी, डॉ. पराग पपलकर, डॉ.सौरभ गांधी डॉ. हर्षल भोई आदी नामांकित डॉक्टर यांनी दिवसभर परिषदेत पोटविकाराबाबत निदान आधुनिक तपासण्या, आधुनिक उपचार पध्दती, पोट विकार शस्त्रक्रिया, पोटविकार भूल या विषयावर सर्वकर्ष माहिती देण्यात आली. तसेच सर्वसामान्य माणसाला व प्रत्येक डॉक्टराना उपयुक्त अशी “बेसिक लाईफ सपोर्ट किंवा जीवन संजीवनी” यांची कार्यशाळा व परिसंवाद याठिकाणी पार पडला.या परिषदेस कोल्हापूर परिक्षेत्रातील ५०० हून अधिक डॉक्टर सहभागी झाले होते. वैद्यकीय व इतर विषयावरील पोस्टर प्रदर्शन भरविले गेले होते.जनरल प्रॅक्टिशनर्स असोसिएशन कोल्हापूर मार्फत प्रत्येक वर्षी वैद्यकीय व सामाजिक क्षेत्रात उत्कृष्ट काम केले बद्दल जीवन गौरव पुरस्कार दिला जातो यावर्षीचा हा पुरस्कार डॉ. शितल नेमगोंडा पाटील यांना प्रदान करण्यात आला.या परिषदेमध्ये जनरल प्रॅक्टीशनर्स संघटनेचे सदस्य यांचा हिंदी गाण्याचा बहारदार कार्यक्रम लाईव्ह ऑर्केस्टा सादर करण्यात आला.यावेळी व्यासपीठावर अध्यक्ष डॉ. अरुण धुमाळे,सेक्रेटरी डॉ.महादेव जोगदंडे, जीपिकॉन सेक्रेटरी डॉ.पूजा पाटील, खजिनदार डॉ,गुणाजी नलवडे, डॉ.प्रशांत खुटाळे,डॉ.वर्षा पाटील, डॉ.शिवराज जितकर, डॉ,राजेश सोनवणे, डॉ. दीपक पोवार,डॉ.हरीश नांगरे, डॉ.किशोर निंबाळकर, डॉ,शशिकांत पाटील, डॉ.शिवाजी मगदूम. डॉ.शुभांगी पार्टे, डॉ रमेश जाधव,डॉ.विनोद घोडगे आदी उपस्थित होते.यावेळी स्वागत अध्यक्ष डॉ. अरुण धुमाळे, यांनी केले.प्रस्ताविक प्रशांत कुटाळे,सूत्रसंचालन डॉ .सुनीता देसाई, डॉ.स्नेहा जोगदंडे, डॉ.शितल मगदूम, डॉ.स्वाती नांगरे आणि नितीन कागलकर यांनी केले.आभार सचिव डॉ.महादेव जोगदंडे यांनी मानले.
Leave a Reply