
कोल्हापूर: कसबा बावडा येथील डॉ.डी.वाय. पाटील पॉलिटेक्निकमध्ये टाटा मोटर्स प्रायव्हेट लिमिटेड पुणे यांच्या कॅम्पस इंटरव्यू झाल्या. यामध्ये डी.वाय. पाटील पॉलिटेक्निकसह जिल्ह्यातील पंधरा पॉलिटेक्निकच्या २४३ विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला.टाटा मोटर्सचे सीनियर मॅनेजर संजय भोळे, एच. आर. ऑफिसर राजेश रोकडे, ऋषिकेश गुंड यांनी या इंटरव्यू घेतल्या.या कॅम्पस इंटरव्यू मध्ये डी. वाय. पाटील पॉलिटेक्निकसह डी.वाय. पाटील तळसंदे, बापूजी साळुंखे पॉलिटेक्निक, न्यू पॉलीटेक्निक, गव्हर्नमेंट पॉलीटेक्निक कराड, गव्हर्नमेंट पॉलीटेक्निक कोल्हापूर, संजय घोडावत पॉलिटेक्निक, आय.सी.आर.ई पॉलीटेक्निक गारगोटी, ए.डी.शिंदे पॉलिटेक्निक गडहिंग्लज, शरद पॉलिटेक्निक यद्राव लठ्ठे पॉलिटेक्निक, भारती विद्यापीठ, पीव्हीपीआयटी बुधगाव, अशोकराव माने पॉलिटेक्निक येथील विद्यार्थी सहभागी झाले होते.यावेळी बोलताना डी.वाय. पाटील पॉलिटेक्निकचे प्राचार्य डॉ.महादेव नरके यांनी, विद्यार्थ्यांना या कॅम्पस इंटरव्यूच्या माध्यमातून टाटा मोटर्स सारख्या नामवंत कंपनीमध्ये जॉबची संधी प्राप्त झाली आहे.डिप्लोमा करत असताना कॅम्पस इंटरव्यू मध्ये मिळालेली संधी न दवडता ताकदीने प्रयत्न करावी.जॉब मिळवताना टेक्निकल नॉलेज, अनुभव, टीमवर्क, ह्यूमन रिसोर्स व्यवस्थापन या महत्त्वाच्या बाबी असल्याचे त्यांनी नमूद केले.टाटा मोटर्सचे सीनियर मॅनेजर संजय भोळे यांनी, टाटा . मोटर्स ही एक कंपनी नाही तर एक फॅमिली असल्याचं सांगितलं. प्रॅक्टिकल ज्ञान आणि अनुभव अधिक महत्त्वाचे आहे. सर्टिफिकेट आणि त्या जोडीला अनुभव असेल तर भविष्यात तुम्हाला अजून मोठ्या संधी उपलब्ध होतील असेही त्यांनी सांगितले.यावेळी उपप्राचार्य नितीन माळी, रजिस्ट्रार महेश रेनके, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर अजय बंगडे, विभाग प्रमुख प्राध्यापक शितल साळोखे, प्राध्यापक एस.बी.शिंदे, विविध 15 पॉलीटेक्निकचे विद्यार्थी उपस्थित होते.
Leave a Reply